Diwali 2024 : रविवारची सुट्टी सार्थकी लावा, या सोप्या स्टेप्सनी घरीच दिवाळीचा आकाश कंदिल बनवा

Diwali 2024 : तुम्ही एक सुंदर असा आकाश कंदील घरीच बनवू शकता. तेही अगदी सोप्या आठ पायऱ्यांमध्ये.
Diwali 2024
Diwali 2024 esakal
Updated on

Akash Kandil Diy :

दिवाळीसाठी प्रत्येक जण आज रविवारचा दिवस राखून ठेवतो. कारण, या दिवशी ऑफिसला सुट्टी असते आणि दिवाळीची खरेदी करायची असते. कारण उद्यापासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे आज खरेदी करायची असते. त्यामुळेच सुट्टीच्या दिवशी बाजारपेठा सजलेल्या असतात.

तुम्ही आज आकाश कंदील घरी आणण्याचा प्लॅन करत असाल. तर त्यासाठी वेळ वाया घालू नका. तुम्ही एक सुंदर असा आकाश कंदील घरीच बनवू शकता. तेही अगदी सोप्या आठ पायऱ्यांमध्ये. हा आकाश कंदील कसा बनवायचा त्यासाठी साहित्य काय काय लागतं, याबद्दल जाणून घेऊया.

Diwali 2024
Diwali 2024 : कुठे अभ्यंगस्नान तर कुठे सार्वजनिक सुट्टी, जगभरात अशी साजरी होते दिवाळी

आकाश कंदीलसाठी लागणारे साहित्य

तीन A2 आकाराचे कागद, हे कागद तीनही वेगवेगळ्या रंगांचे निवडा. रंगीत कागदी फिती, ग्लिटर गिफ्ट रॅपिंग पेपर, दोरी किंवा रिबन, डिंक किंवा टेप; कात्री आणि स्टेपलर

Diwali 2024
Diwali 2024: दिवाळीत कधीही करू नका 'या' 8 सामान्य चुका

आकाश कंदिल बनवण्याची सोपी पद्धत

लाल रंगाचा कागद लांबी 11 इंच आणि रूंदी 6 इंच मोजून आयताकृती पद्धतीने कापून घ्या. नंतर ते शेंगदाण्याच्या पुडीसारखा रोल करा.

आता हिरव्या रंगाचा कागद 7.5 x 7.5 इंच असे चौकोन कापून घ्या. त्यानंतर गुलाबी रंगाच्या कागदाचे 6.5 x 6.5 असे चौकोनी तुकडे करा.

हिरव्या चौकोनावर गुलाबी चौकोन चिकटवा. अगदी मध्यभागी. यामुळे प्रत्येकी एक चौकोनाची हिरवी बॉर्डर सर्वत्र दिसेल.

Diwali 2024
Diwali Health 2024: दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणापासून स्वतःची घ्या काळजी, 'या' टिप्स करा फॉलो

हिरव्या आणि गुलाबी रंगाचे असे 10 चौकोन तयार करा. आता चौकोनाचे दोन विरुद्धार्थी कोपरे पकडून चिकटवा, गुलाबी रंगाचा कागद आतून समोर ठेवा. त्यानंतर आधी बनवलेल्या मोठ्या त्रिकोणी आकारातील रोलच्या बाजूने चिकटवा.

गिफ्ट रॅपिंग पेपरच्या एक इंच रुंद पट्ट्या कापून घ्या. या पट्ट्या सिलेंडरच्या वरच्या आणि खालच्या भागांवर चिकटवण्यासाठी वापरल्या जातील.

Diwali 2024
Diwali 2024: धनत्रयोदशीच्या दिवशी 10 रुपयांत खरेदी करा 'या' वस्तू, तुमचे नशीब उजळेल

शेवटी कागदाच्या फिती समान लांबीमध्ये कापून घ्या. या रिबन्सची जितक्या मोठ्या आकारात असतील तितके चांगले असेल.

आकाश कंदिल तुम्ही कुठे लावणार आहात त्यानुसार त्याला रिबन जोडून घ्या.

आता तुम्ही ते तुमच्या घराच्या बाहेर, बाल्कनीत लावू शकता. त्याच्या आत एक बल्ब जोडा. तुमचा घरी बनवलेला आकाशकंदील तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.