How to Control Bad Cholesterol In Diwali: दिवाळीत सर्वांच्या घरी चिवडा, चकली, शंकरपाळे यासारखे विविध पदार्थ बनवले जातात. तसेच दिवाळी दरम्यान कोणाकडे गेल्यावर देखील या पदार्थांचा फराळ दिला जातो. पण रोज तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्याने आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात. यामध्ये सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा. दिवाळीत शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.