Diwali 2024 Follow Vastu Tips : वास्तूशास्त्रात घर, दुकान यासारख्या अनेक गोष्टीसाठी उपाय सांगितलेले आहे. तसेच दिवळीसाठीही काही वास्तू टिप्स सांगितल्या आहेत. यंदा दिवळा १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीची सुरूवात धनत्रयोदशीने २९ ऑक्टोरला होणार आहे. दिवाळीत घरातील मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीचे पाऊल किंवा शुभ-लाभ लावणे शुभ मानले जाते. पण हे लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
दिवाळीत मुख्यप्रवेशद्वारावर माता लक्ष्मीचे पाऊल किंवा शुभ-लाभचे स्टिकर लावणे शुभ मानले जाते. माता लक्ष्मीच्या पाऊलांचा आकार हाताच्या तळव्या एवढा असावा. त्याता रंग लाल,हिरवा, पिवळा किंवा गुलाबी असावा. रंगीत पाऊल देकील शुभ मानले जाते. शुभ-लाभचे स्टिकर स्पष्ट वाचता येतील असे असावे. शुभ-लाभचे स्टिकर जास्त मोठे नसावे. तसेच शुभ-लाभचे स्टिकर जोडलेले नाही तर वेगवेगळे असावे.
अनेक लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस लक्ष्मीचे पाऊल लावतात. असे करणे चुकीचे आहे. यामुले पाऊल लावतांना असेल लाव जे येता-जातांना तुम्हाला दिसेल. तसेच शुभ-लाभचे स्टिकर लावताना त्यावर नजर पडेल अशा दिशेने दारावर लावावे. तसेच लाल रंगाचे किंवा रंगीत शुभ-लाभ लावू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.