Identify Real Almond : दिवाळीसाठी बाजारात आलेत निकृष्ट बदाम, घरीच असा ओळखा डुप्लिकेट अन् ओरिजनल बदामातील फरक

How to identify real almond quality at home: दिवाळीच्या काळात बाजारात बदामाची मागणी जास्त असते. त्यामुळे अशा वेळी निकृष्ट दर्जांचे बदाम विकले जातात. पण तुम्ही घरीच खरेदी केलेले बदाम बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे आहेत हे ओळखू शकता. यासाठी पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.
Almond
AlmondSakal
Updated on

how to identify real almond quality at home: सणासुदीत बदामाची मागणी वाढली आहे. यामुळे बाजारात बनावट आणि भेसळयुक्त बदाम विक्रीस आले आहे. बदामाचा रंग आणि चमक वाढवण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड आणि ब्लीचिंग एजंट्स सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करतात. या भेसळयुक्त बदामाचे सेवन केल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. भेसळयुक्त बदाम तुमच्या आरोग्यासाठी कसे हानिकारक असू शकतात आणि तुम्ही घरीच खरे आणि नकली बदाम कसे ओळखू शकता हे जाणून घेऊया.

भेसळ का केली जाते?

बदामात विविध प्रकारची भेसळ केली जाते. सणासुदीत बदामाची मागणी वाढली की अनेक व्यापारी निकृष्ट दर्जाचे बदाम विकतात. निकृष्ट दर्जाच्या बदामांमुळे पोटाच्या समस्या, त्वचेची अँलर्जी तसेच शरीरावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

खराब बदाम खाल्यास होणारे वाईट परिणाम

हायड्रोजन पेरोक्साईड सारख्या रसायनांमुळे पोट आणि आतडेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे दिसतात. निकृष्ट आणि कमी दर्जाच्या बदामांचे दीर्घकाळ सेवन केल्याने पचनसंबंधित गंभीर विकार होऊ शकतात. म्हणूनच असे बदाम खाणे टाळावे

रोगप्रतिकाशक्ती कमी होणे

खराब आणि कमी दर्जाचे बदाम खाल्ल्याने काही लोकांना रसायनांची ॲलर्जी होऊ शकते. यात खाज सुटणे आणि पुरळ उठणे यासारख्या सौम्य लक्षणांपासून ते ॲनाफिलेक्सिससारख्या गंभीर परिस्थितीपर्यंत लक्षणे असू शकतात. इतकेच नाही तर असे बदाम रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात.

Almond
Diwali 2024 Party Idea: घरीच दिवाळी पार्टीचे नियोजन करताय? मग 'या' गोष्टींची घ्या मदत, कमी बजेटमध्ये कराल धमाल-मस्ती

घरीच खऱ्या बदामाची ओळख कशी कराल?

बदाम चांगले आहे की खराब हे ओळखण्यासाठी पाण्याचा वापर करावा. यासाठी पाण्यात ५ते ७ बदाम रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी बदाम पाण्यातून काढा आणि सोलून घ्या. नैसर्गिक बदामाची साल सहज निघते, खाली स्वच्छ, पांढरे बदाम दिसतात. पाण्याचा रंग तपासावा. जर ते स्वच्छ राहिले तर बदामात भेसळ नाही आणि पाण्याचा रंग तपकिरी झाला तर याचा अर्थ बदामात केमिकल वापरण्यात आले आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.