Work Life Balance On Diwali: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा भारतात दिवाळी काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीपूर्वी स्वच्छतेपासून ते सजावट आणि खरेदासाठी वेगळा वेळ काढावाव लागतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी घराबरोबरच ऑफिसच्या कामाचे नियोजन करणे अवघड असते. त्यांना एकाच वेळी दोन्ही कामांकडे लक्ष द्यावे लागते. अशावेळी कामाचा ताण वाढू शकतो. ताण वाढल्यास चिडचिड होणे सामान्य बाब आहे. यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना पुढील गोष्टींची मदत घेऊन कामाचे नियोजन करू शकता. ज्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.