Lungs Care Tips: दिवाळीदरम्यान देशभरातील अनेक राज्यांमध्ये प्रदुषण वाढल्याच्या बातम्या वाचल्या असतील. बदलते हवामान आणि धुक्याचे प्रमाण वाढल्याने फाटाक्यांव्यतिरिक्त हवेची गुणवत्ता घसरली आहे. वायू प्रदूषणाचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. खराब हवेच्या गुणवत्तेंमुळे फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे दमा, बॅक्टेरिया आणि टीबीसारखे आजार होऊ शकतात. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घेऊ शकता.