Diwali 2024 Party Idea: घरीच दिवाळी पार्टीचे नियोजन करताय? मग 'या' गोष्टींची घ्या मदत, कमी बजेटमध्ये कराल धमाल-मस्ती

Diwali Party Idea: दिवाळी मित्रासोबत पार्टीत धमाल-मस्ती करायची असेल तर पुढील सोप्या गोष्टींची मदत घेऊ शकता.
Diwali
Diwali Party IdeaSakal
Updated on

Diwali 2024 Party Idea: दसऱ्यानंतर सर्वंजण दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. घराची स्वच्छता करणे, साजावटीसाठी विविध साहित्य किंवा गोष्टी खरेदी करणे, फराळ बनवणे यासारख्या गोष्टींसाठी सर्वांनी तयारी सुरू केली आहे. इतकेच नाही कर अनेकजण हा सण मित्र आणि कुटूंबीयांसह साजरा करण्यासाठी घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करतात. पण यंदा घरी दिवाळी पार्टी करत असाल आणि बजेटचे ताण येत असेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता. ज्यामुळे कमी बजेटममध्ये दिवाळी पार्टीचा आनंद लूटू शकाल.

हटके दिवाळी पार्टीसाठी पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता

पाहुण्यांची यादी

दिवाळी पार्टीत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार केल्यास बारीच्या कामाचे नियोजन करणे सुलभ होते. जे लोक येणार आहेत त्यांच्या नावापुढे टिक करावे. त्यानुसार सर्व काम सहज होतील.

घराची सजावट

दिवाळी पार्टीत घराच्या सजावटीची खास काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी मेणबत्त्या होल्डरमध्ये दिवे, रांगोळी, मेणबत्त्या यासारख्या गोष्टींचा वापर करू शकता. यामुळे रात्रीच्या वेळी घर अधिक आकर्षक दिसेल तसेच पार्टीचा आनंद देखील द्विगुणित होईल.

खाद्यपदार्थांची यादी

पार्टीतील पाहुण्यांना एक गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहते ती म्हणजे तिथले जेवण. बऱ्याच लोकांना नेहमीच चवदार पदार्थ आठवणीत राहतात. तुम्ही तुमच्या दिवाळी पार्टीच्या मेन्यू कार्डमध्ये पाणीपुरी, गुलाब जामुन, चिवडा, शंकरपाळे, चकली, शेव यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता.

Diwali
Diwali 2024 Fashion Tips: तुम्हालाही सणासुदीत परफेक्ट लूक हवायं? मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये 'या' 4 प्रकारच्या साड्या असल्याच पाहिजेत

बजेट

पार्टीसाठी बजेट तयार करावे. तुम्ही कमी बजेटमध्ये देखील पार्टीचे आयोजन करू शकता. बजेटनुसार योग्य गोष्टींवर खर्च करावे. दिवाळी पार्टी मजेदार करण्यासाठी तुम्ही चांगले संगीत आणि सजावटीची मदत देखील घेऊ शकता.

खेळ आणि संगीत

दिवाळी पार्टी मज्जा खेळ आणि संगीताशिवाय अपुर्ण असते. तुम्ही तुमच्या दिवाळी पार्टीमध्ये पत्ते खेळ, अंताक्षरी, स्पिन द व्हील आणि मोनोपॉली यासारख्या खेळांचा समावेश करून तुमच्या पार्टीला मजेदार बनवू शकता. दिवाळी पार्टीत वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांची प्लेलिस्ट आधीच तयार करा. ज्यामुळे वेळेवर गाण्यांची शोधाशोध होणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.