Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Window Cleaning Tips: तुमच्या घरी स्लायडिंगच्या खिडक्या असतील आणि दिवाळीत स्वच्छ करायच्या असेल तर पुढील काही सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.
Window Cleaning Tips:
Window Cleaning Tips:Sakal
Updated on

Window Cleaning Tips: अनेक घरांमध्ये दिवाळीती स्वच्छता सुरू आहे. अनेक सोसायटी फ्लॅटमध्ये स्लायडिंगच्या खिडक्या किंवा दरवाजे असतात. या वापरायला किंवा दिसायला आकर्षक असतात. पण स्वच्छता करतांना खुप काळजी घ्यावी लागते. स्लायडिंग पट्टीत खुप धूळ जमा झालेली असते. जे स्वच्छ करणे सोपे नसते. दिवळी फक्त काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी घराची स्वच्छता कमी वेळेत आणि कमी मेहनतीत करायची असेलतर पुढील पद्धतींचा वापर करू शकता.

Window Cleaning Tips:
Window Cleaning Tips:Sakal

व्हिनेगर

व्हिनेगरचे मिश्रण वापरून दरवाजे आणि खिडक्यांचे ट्रॅक स्वच्छ करता येतात. हे करण्यासाठी एक कप पाण्यात अर्धा कप व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा टाका मिक्स करा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरावे. आता हे पाणी दाराच्या ट्रॅकवर साचलेल्या घाणीवर पूर्णपणे फवारावे. यानंतर, कोणत्याही प्रकारचे क्लिनर वापरून घाण स्वच्छ करावी. कमी वेळेत स्लायडिमग विंडो स्वच्छ होईल.

Window Cleaning Tips:
Diwali 2024 Cleaning Tips: दिवाळीपुर्वी किचनमधील 'हे' 5 कोपरे करा स्वच्छ, माता लक्ष्मी होईल प्रसन्न
Sakal
Window Cleaning Tips:Sakal

जूना टूथब्रश

दरवाजे आणि खिडक्यांचे ट्रॅक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जुन्या टूथब्रशचा वापर करू शकता. या ब्रशच्या मदतीने खिडकीच्या रुळावर साचलेली धूळ पूर्णपणे घासून घ्या. यानंतर व्हॅक्यूम क्लिनरच्या ब्रशने ते व्हॅक्यूम करा. जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर नसेल तर तुम्ही हेअर ब्लोअरच्या मदतीनेही हा कचरा काढू शकता. यामुळे कमी वेळेत स्लायिंग विंडो स्वच्छ होतील. तसेच तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.

Window Cleaning Tips:
Window Cleaning Tips:Sakal

लाकडी पट्टी

स्लायडिंग खिडक्या स्वच्छ करण्यासाठी कापड आणि लाकडाची मदत घेऊ शकता. हा उपाय करण्यासाठी स्लायडिंग दरवाजाच्या ट्रॅकमध्ये कोमट पाणी घाला. आता कापडाने काठी गुंडाळा आणि ट्रॅकमध्ये साचलेली घाण स्वच्छ करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.