Diwali Faral 2024: दिवाळी अन् फराळ हे समीकरणच असे आहे, की त्याचदिवशी दिवाळीचा सणाची कल्पनाच होऊ शकत नाही. दिवाळी आली, की फराळ आणि मेवामिठाईची लज्जतच वेगळी असते. दिवाळीमध्ये मेवामिठाई अन् फराळातून कोट्यवधींची उलाढाल होत असते. .दिवाळी आली की घरोघरी घरगुती पद्धतीने दिवाळीचा फराळ केला जातो. शेव-चिवडा, लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी, अनारसे बनविले जातात. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. परंतु अलीकडे धकाधकीचे जीवन आणि पुरेसा वेळ मिळत नसल्याने यातील बहुतांशी फराळाची पदार्थ रेडिमेड खरेदी केली जातात. मात्र हे खरेदी करीत असताना नामांकित मिठाईच्या उत्पादकांना पसंतीही दिली जाते. यातून दिवाळीच्या काळात कोट्यवधींची उलाढालही होते. याप्रमाणे, दिवाळीच्या सणाला घरात गोडधोड पदार्थ बनविण्याचीही पद्धत आहे..Diwali Padwa 2024 Wishes: 'दिवाळीचा पाडवा नात्यात आणतो गोडवा...!' दिवाळी पाडव्याच्या प्रियजनांना द्या हटके शुभेच्छा .दिवाळीत आप्तस्वकीय, मित्रमंडळी, कार्यालयीन सहकार्यांना भेट म्हणून मिठाई देण्याचीही प्रथा आहे. त्यासाठी शहरातील नामांकित मेवामिठाई उत्पादकांकडे मागणी वाढली आहे. यात अर्धा किलोपासून ते एक-दोन किलोच्या पॅकमध्ये मेवामिठाईचा समावेश आहे. यात काजूकतली, पेढा, बुंदीचे लाडू, बेसन लाडू यासह काही पॅक हे दिवाळी फराळाच्या पदार्थांचाही समावेश असतो.याशिवाय काही ग्राहकांकडून सुकामेव्यांचीही मागणी केली जाते. त्यादृष्टीनेही बाजारात आकर्षक असे विविध पॅकिंगमध्ये सुकामेवा भेट देण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे शहरातील मेवामिठाई व फराळ उत्पादकांचे दालनही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सजली आहेत.दर्जा कायमभेसळयुक्त मेवामिठाई देखील बाजारात विक्री असते. असे असले तरी काही नामांकित मेवामिठाई व दिवाळी फराळ उत्पादकांनी पदार्थांचा दर्जा टिकवून ठेवला आहे. त्यामुळे ग्राहकही विश्वासाने त्यांच्याकडूनच मेवामिठाई व फराळाची खरेदी करतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.