Diwali Gifts : दिवाळीत प्रियजनांना द्या हे गिफ्ट्स, त्यांचीही दिवाळी होईस दणक्यात साजरी

Budget Friendly Gifts For Diwali : आज आम्ही तुम्हाला असे काही ऑप्शन्स सांगणार आहोत जे तुमच्या प्रियजनांना आवडतील अन् तुमच्या बजेटमध्येही असतील.
Diwali Gifts
Diwali Giftsesakal
Updated on

 Diwali Gift Idea :

दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे घरोघरी दिवाळीची खरेदीही सुरू झाली आहे. दिवाळीत फराळाची तयारी, कपड्यांची शॉपिंग, बालचमूंच्या सुट्ट्या यामुळे घरात अगदी लगबग सुरू असते. दिवाळीसारख्या मोठ्या सणाला आपण पाहुणे मंडळी, मित्र मंडळी यांकडे जातो. दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्यासाठी गिफ्ट घेतो.  

दिवाळीत सर्व पाहुण्यांना काही गिफ्ट देण्याचा तुम्ही विचार करत असाल. तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. कारण, आज आम्ही तुम्हाला असे काही ऑप्शन्स सांगणार आहोत जे तुमच्या प्रियजनांना आवडतील अन् तुमच्या बजेटमध्येही असतील.

Diwali Gifts
Diwali Recipe :  दिवाळीच्या आठवडाभरातही मऊसूत राहतील असे नारळीपाकाचे लाडू नक्की ट्राय करा

या दिवाळीत तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अगदी कमी बजेटमध्ये भेटवस्तू देऊन तुमचे नाते खास बनवू शकता. तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू तुमच्या मित्रांनाही भेट देऊ शकता. चला तर मग पाहूया दिवाळी गिफ्ट आयडिया?

 

घड्याळ

या दिवाळीत तुम्हीही तुमच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल. तर, तुम्ही चांगल्या कंपनीचे घड्याळ देऊ शकता. तुम्ही स्मार्ट घड्याळ देखील खरेदी करू शकता.

Diwali Gifts
Diwali 2024 Outfit Ideas: यंदा दिवाळीत साडी-लेहेंगा घालायचा नसेल तर इंडो-वेस्टर्न ड्रेस घालून सणाचा आनंद करू शकता द्विगुणित

ड्रायफ्रूट्सचा बॉक्स

या दिवाळीत इतर निरोपयोगी वस्तूही अनेक लोक भेट म्हणून देतात. पण, पाहुण्यांसाठी तुम्ही सुक्या मेव्यांचा बॉक्स खरेदी करून तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.हा एक हेल्दी ऑप्शन आहे.

चांदीचे नाणे

दिवाळीचा सण संपत्ती आणि समृद्धी घेऊन येतो. चांदीला देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही दिवाळीला तुमच्या प्रियजनांना चांदीचे नाणेही देऊ शकता.

चॉकलेट बॉक्स

दिवाळीत प्रत्येकाच्या घरी मिठाई बनलेली असते. त्यामुळे लोकांना तीच परत गिफ्ट देऊ नका. तुम्ही मिठाईऐवजी मित्रांना चॉकलेटचे बॉक्स गिफ्ट करू शकता. त्यात वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स असतात. घरातील बालचमूंना तर हे गिफ्ट हवेहवेसेच वाटते.

Diwali Gifts
Diwali 2024 Recipe: यंदा दिवाळीत बनवा खुसखुशीत बिस्कीट शंकरपाळी, पाहा सोपा व्हिडिओ

पूजेचे साहित्य

घरात भक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही पूजेत वापरले जाणारे साहित्याचा पुडा देऊ शकता. यात अगरबत्ती, कापूर, मोत्याच्या माळा, देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू असतात. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भक्तिभावाने भेट देऊन आनंदित करू शकता. ही एक उपयोगात येणारी भेट ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.