डॉ. समीरा गुजर-जोशी
दिवाळीच्या निमित्तानं अनेक नातेवाईक, मित्र-मंडळी भेटतात. गप्पा होतात. एकमेकांची ख्यालीखुशाली कळते. आपलं रोजचं ठरलेलं रूटिन बाजूला ठेवून आपण वेगळं वागू शकतो. खरंतर, सण म्हटलं, की नेहमीपेक्षा जास्त धावपळ होते; पण तरी त्या बदलामुळे आपण ताजेतवाने झालो आहोत असं वाटतं. पण एक गोष्ट, मैत्रिणी, तू नोटीस केलीस का? की इतक्या आनंदाच्या छान वेळी कोणीतरी पटकन काहीतरी बोलून जाते आणि उगीच मनात सल निर्माण करून जाते.