Diwali Recipe : दिवाळीची स्वच्छता करताना काही रहायला नकोय, तुम्ही घरातील या ठिकाणांची स्वच्छता केली का?

Home Cleaning Tips : घर स्वच्छ करणे आणि झाडणे यासाठी बराच वेळ काढावा लागतो. कारण एका दिवसात स्वच्छ होईल हे शक्यच नसतं
Diwali Recipe
Diwali Recipe esakal
Updated on

Home Cleaning Hacks :

दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. महिलावर्ग फराळाच्या वस्तू कारणांमध्ये गुंग आहेत. तर पुरुष मंडळी त्यांना या कामात छोटी छोटी मदत करत आहेत. वर्किंग वूमन तर या काळात तारेवरची कसरत करत आहेत.

अशावेळी घर स्वच्छ करणे आणि झाडणे यासाठी बराच वेळ काढावा लागतो. कारण एका दिवसात स्वच्छ होईल हे शक्यच नसतं. त्यामुळे काहीतरी गोष्टी राहून जातात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक कामाची बातमी आणली आहे. (Home Cleaning Tips)

Diwali Recipe
Diwali Festival 2024 : दीपोत्सवासाठी झगमगणारे आकाश कंदील दाखल; किमतीत 20 टक्क्यांनी वाढ

तुमच्या या स्वच्छतेच्या मोहिमेत घरातील एखादी गोष्ट घाणेरडी राहू नये, यासाठी तुम्ही ही लिस्ट चेक करू शकता. त्यामध्ये तुम्ही घरातील कोणत्या कोणत्या गोष्टी स्वच्छ केल्यात आणि कोणते राहिलेत हे लगेचच तुमच्या लक्षात येईल.

 

घरातील कपाटे

आपण कपाटे खालून वरून साफ करतो. कपाटाखाली असलेली धूळ आपण रोज काढतो. पण, कपाटांमध्ये असलेली घाण आपण अनेकवेळा दूर करत नाही. प्रत्येकवेळी तुम्हीही दिवाळीच्या या धावपळीत कपड्यांची कपाटे, वॉर्डरोब स्वच्छ करायला विसरू नका. कारण कपाटात असलेल्या धुळीमुळे कपड्यांवरही धुळ जमते अन् कपडे खराब होऊ शकतात.

Diwali Recipe
Jalgaon Diwali: व्यापारात आजही ‘रोजमेळ अन् खतावणी’ टिकून! लक्ष्मीपूजनासाठी व्यापाऱ्यांकडून खरेदीची लगबग; बाजारात विविध प्रकार

घरातील जळमट

घर कितीही मोठं असलं तरी त्यामध्ये जाळ्या, जळमटं,धूळ साचतेच. कोष्टी जमेल तिकडे जाळ्या करत असतात. पण याचा नंतर आपला त्रास होऊ शकतो. घरात अशा जाळ्या असणं नकारात्मक ठरू शकत. त्यामुळे घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिसणाऱ्या जाळ्या दिसता क्षणी साफ करा.

Diwali Recipe
Diwali Festival : दिवाळी सणामुळे बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण पणत्या, आकाशकंदील, कपड्यांची सजली दुकाने

स्वयंपाक घर

घरातील सर्वात जास्त धूळ आणि जाळ्या असणाऱ्या ठिकाण म्हणजे स्वयंपाक घर. तुम्हीही स्वयंपाक घर स्वच्छ करायला विसरू नका. या जागी आपलं जेवण बनवलं जातं ती जागा स्वच्छ असेल तर आपण निरोगी जीवन जगू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक या गोष्टी लक्षात ठेवा.

Diwali Recipe
Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

घरातील टीव्ही युनिट स्वच्छ करा

आजकाल वेगवेगळ्या आकाराच्या आणि स्वरूपाचे टीव्ही युनिट बाजारात आहेत. या टीव्ही युनिटच्या डिझाईनमध्ये अनेक वेळा जाळ्या जाऊन असतात. त्यामुळे घरातील फर्निचर आणि टीव्ही युनिट नक्की स्वच्छ  करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.