Diwali Decoration : आली माझ्या बाल्कनीत ही दिवाळी; ‘या’ टिप्सने सजवा तुमची बाल्कनी

पूर्वी घरी मोठ्या अंगणात आकाश कंदील, दिवे आणि रांगोळी याने दिवाळी सजायची
Diwali Decoration news
Diwali Decoration newsesakal
Updated on

नवरात्र संपल्यानंतर आता आतुरता आहे दिवाळी सणाची. सर्वात मोठा आणि वर्षातला शेवटचा सण. प्रत्येक जण आपल्या घराला हटके पद्धतीने कसं सजवता येईल, याच्या तयारीत लागलेला दिसून येतो. आपआपल्या आवडीनुसार घराच्या सजावटीसाठी प्रत्येकजण काही ना काही गोष्टी करण्यात व्यस्त असतो. एकदम मोठं काम निघालं तर मग खर्चाचा आकडा वरची पातळी गाठतो. तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, अतिशय कमी खर्चाच पण हटके पद्धतीने घराची सजावट करण्यासाठी भन्नाट आयडियाज.

पूर्वी घरी मोठ्या अंगणात आकाश कंदील, दिवे आणि रांगोळी याने दिवाळी सजायची. पण, आता फ्लॅट सिस्टीममध्ये ती जागा बाल्कनीने घेतली आहे. बाल्कनी ही लहानांसाठी खेळण्याची, एक्स्ट्रा सामान ठेवण्याची, ऑफिसवरून आल्यावर निवांत वेळ घालवण्याची हक्काची जागा बनली आहे. सगळे सण समारंभ बाल्कनीतच पार पडतात. त्यामुळे बाल्कनी नेहमी स्वच्छ आणि सुशोभीत ठेवावी. दिवाळी सुद्धा बाल्कनीतच साजरी केली जाते. त्यामुळे दिवाळासाठी काय खास डेकोरेशन करता येईल हे पाहुयात.

Diwali Decoration news
Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

लाइटिंगने उजळेल बाल्कनी

दिव्यांनी उजळल्या शिवाय घरात दिवाळी आहे असे वाटत नाही. दिवाळीला लायटिंगशिवाय घर सजवणे केवळ अश्यक्यच. तूम्ही बाल्कनीसाठी वेगवेगळ्या आकारातील लायटींगच्या माळा, फुलांच्या माळा यांचा वापर करू शकता. तसेच, बाल्कनीत असलेल्या कुंड्यांवर, झाडांवर तूम्ही लायटींग करू शकता. लायटींगमध्ये गोल्डन, सिल्वर आणि कॉपर कलर्सच्या लाइट्सचा वापर करता येऊ शकतो.

Diwali Decoration news
Diwali 2022 : दिवाळीचं वैभव अनुभवायचं; भारतातील 'ही' ठिकाणं आहेत Super

आकर्षक रंग, स्टीकर्स

दिवाळीत बाल्कनी सजवताना भिंती आकर्षक रंगात रंगवणे हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. भिंतीवर लावण्यासाठी वेगवेगळे स्टिकरही मिळतात. बाल्कनीत तुम्हाला हवे असल्यास वॉल हँगिंग्ज, एम्पाना आर्ट, रंगीबेरंगी पेंटिंग आणि मंडला पेंटिंग करून भिंती सजवता येतात. तसेच, पेंटिंग हायलाइट करण्यासाठी तुम्ही त्याभोवती लाईट्सचाही वापर करू शकता.

Diwali Decoration news
Diwali cleaning : यंदाच्या दिवाळीत किचनच्या काळवंडलेल्या टाइल्स चमकवा

सिटींग एरिया करा बेस्ट

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पाहुणे घरी येतात. त्यांना प्रसन्न आणि आरामदायक वाटेल अशी सिटींग अरेंजमेंट करावी. त्यासाठी टेबल, खुर्ची, त्यांचे कव्हर एकाच रंगाचे असावेत. बाल्कनीच्या भिंती ज्या रंगाच्या असतील त्याला क्रॉस उशांचे, कोचवरील कव्हर असावेत. टेबल खुर्ची ठेवलेल्या मागील भिंत फुलांच्या माळांनी सजवावी.

Diwali Decoration news
Diwali Special : दिवाळी किटचे 6 लाख लाभार्थ्यांना वाटप सुरू

टेबल सजवा

टेबल सजवण्यासाठी एका काचेच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या ठेवा. त्यावर तरंगत्या मेनबत्त्या ठेवा. अशीच सजावट तूम्ही बाल्कनीच्या कोपऱ्यातही करू शकता. तसेच दारातील रांगोळीजवळही अशी सजावट आकर्षक दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.