Diwali Decoration : दिवाळीत कमी पैशात घर कसं सजवायचं? इथे आहेत भन्नाट आयडिया

लो बजेट दिवाळी साजरी करायचीय तर या घ्या आयडिया
Diwali Decoration
Diwali Decoration esakal
Updated on

Diwali Decoration

दिवाळी म्हटलं की फराळ, नवी खरेदी,फटाके, सडा-रांगोळी, आकाश दिवे अश्या सगळ्याच गोष्टी डोळ्यांसमोर येतात. दिवाळीत नवी खरेदी म्हणजे भरमसाठ खर्चही होतो. पण अशाही काही गोष्टींवर होणारा खर्च काहीवेळा डोकेदुखी वाढवणारा असतो.

दिवाळीत सजावटीच्या अनेक वस्तू खरेदी केल्या जातात. ज्यांचा पुन्हा काही वापर होत नाही, त्या अशाच कोपऱ्यात पडून राहतात. त्यांचा वर्षभर काही वापर होत नाही. आणि पुढील वर्षीच्या दिवाळीला ते आपण वापरत नाही. 

याच गोष्टींमध्ये तुम्ही कमी पैशात, किंवा घरच्याच वस्तूंनी सजावट कशी करू शकता. ज्यामुळे तुमचे पैसेही वाचतील अन् वेगळं काहीतरी केल्याचे समाधानही मिळेल.

Diwali Decoration
Diwali Faral: दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी; किमती वाढल्याने नागरिक त्रस्त !

कुशन कव्हर, पडदे

दिवाळीला पाहुणे घरी येतात. त्यामुळे घर सजवण्यासाठी पहिली वस्तू असते ती पडदे अन् सोफा, उशी कव्हर. या वस्तू आपण नेहमीच घेत असतो. पण त्यांचा वापर फार कमी होतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या वस्तू घेणं परवडत नाही. अशावेळी उशी, सोफा कव्हरसाठी तुम्ही घरातल्याच नकोशा असलेल्या जून्या साड्यांचा वापर करू शकता.

अगदी कमी पैशात हे कव्हर शिवून देणारे अनेक लोक आहेत. त्याला नेटची झालर लावून त्याची शोभा वाढवता येऊ शकते. तसेच, खिडक्यांच्या पडज्यासाठीही तुम्ही नेट साडी, नेटेड ओढणीचा वापर करू शकता.

तुम्हाला काहीतरी हटके हवं असेल तर एक सारखीच काठपदराची साडी असलेली कव्हर, पडदे करू शकता. सध्या पैठणी ड्रेस, साडीचा ट्रेंड आहे. पण अनेक महिलांच्या कपाटात सेमी पैठणी, बारीक नक्षीकाम केलेल्या साडी असतात. त्यांचाही सुरेख वापर करू शकतो.

Diwali Decoration
Diwali 2023 : दिवाळीला ट्राय करा 'या' सिक्वेन्स साड्या, दिसाल एकदम झक्कास!
साडीपासून बनवलेले उशी कव्हर
साडीपासून बनवलेले उशी कव्हरesakal
एका डिझाईनर साडीचा पडदा आकर्षक दिसेल
एका डिझाईनर साडीचा पडदा आकर्षक दिसेलesakal
Diwali Decoration
Flipkart Diwali Sale : सणासुदीची शॉपिंग होणार खास, फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलची घोषणा! जाणून घ्या ऑफर्स

काच,मातीचे शोपिस

घर सजावट करण्यासाठी दुसरी गोष्टी म्हणजे फ्लॉअर पॉट आणि शोपिस. हे शोपिस केवळ माती, काच किंवा चिनीमातीचे नाहीतर तांब्या-पितळेच्या भांड्यांचेही असतात. जे आपल्या घरातील श्रीमंती दाखवतात. अशा वस्तू टेबलवर ठेवल्याने प्रसन्नही वाटतं.

या वस्तू तूम्ही काचेच्या बाटल्या, पितळेची जूनी भांडी, मातीचे छोटे माठ वापरून बनवू शकता. यासाठी काही लेस, मोती, मणी, डिंक, काही आर्टिफिशिअल फुले यांचाही वापर होऊ शकतो.

घराची भिंत

घराची भिंत केवळ चांगला रंग दिल्याने सुशोभित होत नाही. तर तिच्यावर असलेली एखादी छान फ्रेम, फोटो कोलाज, किंवा नक्षीकाम केलेले चित्र, एखादे पेंटींग लावू शकता.

जर तुम्हाला पेंटिंग किंवा भरतकामाचे काम माहित असेल तर तुम्ही घरच्या घरी भिंतींसाठी पेंटिंग तयार करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन व्हिडिओंमधून टिप्सही घेऊ शकता.

परंपरागत आलेली भांडी जास्त शोभा वाढवतात
परंपरागत आलेली भांडी जास्त शोभा वाढवतातesakal
Diwali Decoration
Flipkart Diwali Sale : सणासुदीची शॉपिंग होणार खास, फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलची घोषणा! जाणून घ्या ऑफर्स

फुलांची सजावट

दिवाळी असेल तर फुलांच्या सजावटीशिवाय घराला शोभा येत नाही. तुमचे घर सजवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. फुलांनी सजवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही.  

यासाठी स्थानिक विक्रेत्याकडून पिवळा आणि केशरी झेंडू खरेदी करा आणि आंबा आणि अशोकाची पाने मिसळून सजावटीसाठी कॉन्ट्रास्ट हार देखील तयार करा. ताज्या फुलांचे तोरण घरात अधिक प्रसन्नता आणते. त्यामुळे ते तुम्ही वापरू शकता.

केवळ हार, फुले नाहीतर मोठ्या हांड्यामधील अशी सजावटही आकर्षक दिसते. ज्यामुळे येणारे पाहुणेही प्रसन्न होतील अन् तुम्हीही काहीतरी वेगळं केलं म्हणून समाधानी व्हाल.

सध्या हे डिझाईन खूप ट्रेंडिंग आहे
सध्या हे डिझाईन खूप ट्रेंडिंग आहेesakal
Diwali Decoration
Diwali Festival 2023 : ‘लक्ष्मी पावलांनी’ बाजारपेठ सजली; विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी

कलात्मक रांगोळी

रांगोळी शिवाय दिवाळी अपूर्णच आहे. सण-समारंभाला सजावटीचाच एक भाग म्हणून पूर्वापार रांगोळी काढली जाते. आजकाल रांगोळी काढण्यासाठी डिझाइन केलेल्या जाळ्या बाजारात उपलब्ध आहेत. याच्या मदतीने तुम्ही सहज रांगोळी काढू शकता किंवा सजावटीतून उरलेल्या फुलांचा वापर करून सुंदर रांगोळीही काढू शकता.

कलात्मक रांगोळी काढून घर सुशोभित होते
कलात्मक रांगोळी काढून घर सुशोभित होतेesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()