Diwali Faral 2024 : दिवाळी फराळ हा भारतीय संस्कृतीतील गोड विषय. दिवाळीपूर्वी आठ दिवस महिला याची तयारी करतात. सध्या त्यांना वेळ नसल्याने त्या पॅकिंग असलेले फराळ खरेदी करतात. तथापि, हे फराळ खरोखरच चांगले आहे का? याबाबत खात्री करूनच खाणे उचित आहे, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. खराब झालेले, कमी दर्जाचे फराळ खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण आहे, असे डॉक्टरांचे मत आहे.