डॉ. समीरा गुजर-जोशी
दिवाळी हा सर्वांत महत्त्वाचा सण मानण्यात येतो. तो एक अतिशय आनंदाचा उत्सव आहे, जो पंचेद्रियांनी साजरा केला जातो. ही पाच इंद्रियं कोणती? तर मानवी शरीर हे पाच ज्ञानेंद्रियांनी किंवा ज्ञानेंद्रियांनी बनलेलं आहे. डोळे - ज्यांनी आपण आजूबाजूचं जग पाहतो, नाक - जे वासाची जाणीव देतं, त्वचा - स्पर्शाची जाणीव देते, जीभ - चवीचं ज्ञान घडवते, तर कान- श्रवणाचं अर्थात ऐकण्याचं साधन आहे. मला तरी असं वाटतं, की दिवाळी हा असा अनुपम सण आहे - ज्याच्या निमित्तानं या सगळ्या इंद्रियांना तृप्तीचा अनुभव येतो.