Diwali Recipe : तोंडात लगेचच विरघळणाऱ्या खुसखुशीत सुक्या खोबऱ्याच्या करंज्या कशा बनवायच्या पहा!

Diwali Special Karanji Recipe : करंजीतही ओल्या अन् सुक्या नारळाची असे दोन प्रकार असतात. इथे आपण सुक्या खोबऱ्याची करंजी कशी बनवायची हे पाहुयात.
Diwali Recipe
Diwali Recipe esakal
Updated on

 Diwali Recipe :

दिवाळीला काहीच दिवसात सुरूवात होईल. बाजारासह घरा-घरात खमंग खुसखुशीत पदार्थांचा सुवास दरवळत आहे. दिवाळीच्या फराळाचे ताट एका पदार्थांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तो म्हणजे करंजी.

करंजी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. करंजीत असलेले सारण अन् वरील कोटींग विरघळणारे असायला हवे. कारण, हे प्रमाण चुकलं की करंजी फसते. त्यामुळे परफेक्ट करंजी कशी बनवायची हे पाहुयात.

करंजीतही ओल्या अन् सुक्या नारळाची असे दोन प्रकार असतात. इथे आपण सुक्या खोबऱ्याची करंजी कशी बनवायची हे पाहुयात.

Diwali Recipe
Diwali Recipe : दिवाळीत नुसता चिवडा बेचव लागतो, विकतची कशाला घरी अशी बनवा कुरकुरीत शेव

साहित्य :

सुक्या खोबऱ्याचा कीस २ वाट्या, १ वाटी रवाळ कणीक, २ वाट्या पिठीसाखर, दीड वाटी मैदा, १ वाटी रवा, ५ टे. स्पून तेल, १ टे. स्पून खसखस, ५ ते ६, वेलदोड्यांची पूड, १ टे. स्पून चारोळी, काजूचे तुकडे, बेदाणे, चिमूटभर मीठ, तळणीला वनस्पती तूप किंवा रिफाईंड तेल.

कृती :

खोबरे किसून मंद आचेवर हलके गुलाबी भाजावे. खसखस खमंग भाजून पूड करावी. चारोळीची पण अर्धवट कुटून पूड करावी. १ वाटी कणीक तुपावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी.

भाजलेले खोबरे हाताने थोडे बारीक करून कणीक, खसखस, चारोळी पूड, काजूचे तुकडे, बेदाणे व २ वाट्या पिठीसाखर घालून सारण तयार करावे. दीड वाटी मैदा, १ वाटी बारीक रवा, चिमूटभर मीठ व ५ टे. स्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवावा.

३ ते ४ तास पीठ भिजल्यावर दूधाचा हात लावून पाट्यावर कुटून मऊ पीठ तयार करावे. त्याच्या २० ते २२ लाट्या कराव्यात. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटून कडेला दूधाचा हात लावून करंजी भरावी. कोरडे सारण कमी भरले जाते म्हणून सारण दाबून भरावे व नीट कडा दाबून चंद्रकोरीच्या आकाराची करंजी कापावी. अशा सर्व करंज्या करून मंद आचेवर तुपात दोन्ही बाजूंनी तळाव्यात.

Diwali Recipe
Diwali Recipe : चकल्या नेहमीच बिघडतात तर अशी बनवा परफेक्ट चकली भाजणी, रेसिपी सेव्ह करून ठेवा

सुक्या नारळाच्या करंज्या तळणीत फुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून दूधाचा हात लावून कडा दाबून बंद कराव्यात. कणीक भाजून घातल्याने सारण चांगले मिळून येते.

वरील सारणात खवा घातला तर चांगला लागतो. २ वाट्या खोबरे किसाला १०० ग्रॅम खवा मंद भाजून मिसळावा. वरील सारणात कणकेऐवजी पाऊण वाटी डाळीचे पीठ खमंग भाजून घातले तर वेगळीच छान चव येते.

ह्या करंज्या जास्त दिवस टिकतात म्हणून दिवाळीत करायची पद्धत आहे. वरील साहित्यात २० ते २२ करंज्या होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.