Diwali Recipe : बुंदी-बेसनाच्या फंदात पडू नका, दिवाळीला अगदी झटपट होणारे हे लाडू बनवा

घरातील काही साहित्य वापरून कमी वेळात बनवले जाणारे हे लाडू चविष्ट अन् आरोग्यदायीही आहेत. चला पाहुयात या खास लाडवांची रेसिपी
Diwali Recipe
Diwali Recipeesakal
Updated on

Diwali Recipe :

दिवाळीच्या फराळाच्या ताटात एक कोपरा असतो तो लाडवांचा. कारण, चिवडा चकली एकाच प्रकारचे बनत असले तरी लाडू अनेक प्रकारचे बनवले जातात. दिवाळीतही बेसनचे, बुंदीचे अन् रव्याचे लाडू असतात. इतरवेळीही गोड पदार्थ म्हणून लाडूला पसंती दिली जाते.

इतरवेळी प्रसादातही बुंदीचे लाडू बनवले जातात. खेडेगावात आजही लग्नाच्या पंगतीत लाडूला मान असतो. असे हे लाडू दिवाळीतही हमखास बनवले जातात. पण, काही वेळा पाक बनवायला चुकला, किंवा बुंदी चांगली नसेल तर लाडू वळायला येत नाहीत. तुम्ही दिवाळीला लाडू बनवण्याचा विचार करत असाल तर हे प्रकार ट्राय करू शकता.

घरातील काही साहित्य वापरून कमी वेळात बनवले जाणारे हे लाडू चविष्ट अन् आरोग्यदायीही आहेत. चला पाहुयात या खास लाडवांची रेसिपी (Diwali Recipe)

Diwali Recipe
Diwali Recipe : गोड नेहमीच बनवताय, यंदा खारी शंकरपाळी ट्राय करा, फराळाची चवच बदलेल

प्रकार एक

साहित्य :

पंढरीपुरी डाळे मिक्सरवर वाटून चाळून तयार पीठ २ वाट्या, अर्धी वाटी साजूक तूप, १ वाटी पिठीसाखर, वेलदोडे, बेदाणे, बदाम काप.

कृती:

डाळ्याचे पीठ तुपात घालून गुलाबी रंगावर भाजावे. गार झाले की १ वाटी पिठीसाखर, वेलदोडे पूड, बेदाणे, बदाम घालून मळून लाडू वळावेत. वरील साहित्यात १३ ते १४ लाडू होतात. अगदी बेसनाच्या लाडूप्रमाणे लागतात. झटपट होतात.

Diwali Recipe
Crespi Vegetable Thalipith Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक कुळीथाच्या पीठाचे व्हेजिटेबल थालीपीठ, पाहा सोपा व्हिडिओ

प्रकार २

साहित्य :

२ वाट्या बारीक स्वा, १ वाटी मैदा, दीड वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी साजूक तूप, वेलदोडे पूड

कृती:

निम्म्या तुपात बारीक रवा भाजायला घ्यावा. थोडा भाजला की उरलेले तूप व मैदा घालून गुलाबी रंगावर भाजावे. थोडे गरम असताना पिठीसाखर व वेलदोडा पूड घालावी व कोमट असताना लाडू वळावेत. पाक करायचा नसल्याने लाडू झटपट होतात.

प्रकार - ३

साहित्य :

२ वाट्या मुगाची डाळ खमंग भाजून केलेले पीठ, अर्धी वाटी साजूक तूप, १ वाटी पिठीसाखर, वेलदोडे पूड

कृती :

मुगाची डाळ खमंग भाजून दळून आणावी. परातीत तूप फेसून त्यात साखर घालून पुन्हा फेसावे, त्यात थोडे थोडे डाळीचे पीठ घालून वेलदोडे पूड घालून गोळा मळून लाडू वळावेत. ज्यांना ह. डाळ सोसत नाही त्यांच्या करता उत्तम लाडू, साखरेऐवजी १ वाटी किसलेला पिवळा गूळ पण चांगला लागतो.

Diwali Recipe
Diwali Recipe : गोड नेहमीच बनवताय, यंदा खारी शंकरपाळी ट्राय करा, फराळाची चवच बदलेल

प्रकार - ४

 साहित्य :

 २ वाट्या उडदाची डाळ खमंग भाजून केलेले पीठ, १ वाटी पिठीसाखर, अधर्धी वाटी साजूक तूप, वेलदोडे पूड, अर्धी वाटी सर्व सुकामेवा.

कृती :

 परातीत तूप फेसून साखर घालून पुन्हा फेसावे. त्यात डाळीचे पीठ वेलदोडा पूड व सुकामेवा घालून लाडू वळावेत. तूप कमी वाटले तर २ चमचे अजून घालावे. थंडीकरता खूपच पौष्टिक लाडू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.