Diwali 2024 : दिवाळीसाठी या छोट्या गोष्टी वापरून घरीच बनवा आकाशकंदील, हे ट्रेंडी डिझाईन्स नक्की ट्राय करा

Diwali Decoration Idea's : आकर्षक आकाश कंदीलच्या आयडीया पाहण्यासाठी पहा हे व्हिडिओ
Diwali 2024
Diwali 2024 esakal
Updated on

Homemade Akash Kandil Idea's :

दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. बाजारात नवनवे आकाश कंदील, दिवे, छोटे आकाश कंदील, नवनवीन तोरणे आली आहेत. अनेक लोकांनी तर आकाश कंदील कोणता घ्यायचा हे सुद्धा ठरले असेल. पण पूर्वीच्या काळात घर सजवण्यासाठीच्या वस्तू घरीच बनवल्या जायच्या. त्यामुळे त्या जास्त काळ टिकून राहायचे.

तुम्ही बाजारातून वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स वापरून बनवलेले, प्लास्टिकचे आकाश कंदील घेण्याचा विचार करत असाल. तर थांबा, असे आकाश कंदील घेण्यापेक्षा तुम्ही घरीच इको फ्रेंडली आकाश कंदील बनवू शकता. तेही कमी वेळात आणि कमी खर्चात.

Diwali 2024
Diwali 2024: तुम्ही नवे स्टार्टअप सुरू केले असेल तर यंदा दिवळीत 'अशी' करा पूजा, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

बाहेर मिळणारे मोठ-मोठे आकाश कंदील जास्त किमतीचे असतात. तुम्ही दरवर्षी नवीन आकाश कंदील घेत असाल तर एखाद्या वर्षासाठी जास्त पैसे गुंतवणे तसे खर्चिकच आहे. त्यामुळे तुम्ही यंदा घरीच कमी साहित्यामध्ये आकाश कंदील बनवू शकता.

तुम्ही बाजारात मिळणारा कार्डशिट पेपर वापरून खूप सुंदर असा हा आकाश कंदील बनवू शकता. हा आकाश कंदील बनवण्यासाठी काय करायचं हे या व्हिडिओत पहा.

वेगवेगळ्या रंगीत कागदापासून बनवलेला हा सुंदर आकाश कंदील तुम्हीही बनवू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने. तो कसा बनवायचा आहे या व्हिडिओत पहा.

तीन लेयरचा दिसणारा हा आकाश कंदील तुम्ही काही रंगीत कागद वापरून बनवू शकता.

झाडांच्या पानांचा आकाराचा हा आकाश कंदील दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि त्यातून येणारे लाइट्स तुमच्या घराला वेगळी शोभा देतात.

एखाद्या बॉक्सासारखा दिसणारा आणि दिवाळीनंतरही घरी शोपीस म्हणून वापरता येणारा हा आकाश कंदील तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवा. पहा तो कसा बनवायचा

चंद्राची चांदणी असलेला आकाश कंदील तुम्ही विकत अनेक वेळा आणला असेल. पण तो घरीच बनवता येतो हे तुम्हाला माहितीये का. तो कसा बनवायचा हे पहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.