दिवाळीत सहकुटुंब फिरायला जाताय... अशी करा घराची सुरक्षा

travel
travel esakal
Updated on

दिवाळीच्या दिवसात मुलांना, मोठ्यांना सुट्टी असल्याने सगळेच घरी असतात. एकत्र मिळून फराळ केला जातो. सगळे एकत्र जमल्याने सुट्यांचे बेत आखले जातात. मग दिवाळीच्या नंतर सहकुटुंब फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडतात. मग रिकामं उरतं ते छान सजवलेलं घर.

दिवाळीच्या काळात सर्व सण साजरे करण्यासाठी साहजिकच अनेकजण सोन्याचे दागिने घालायला पसंती देतात. पूजेसाठी चांदीच्या वस्तू वापरल्या जातात. हे सगळं दिवाळीच्या आधी अनेक घरांमघ्ये लॉकरमध्ये ठेवलेले असते. पण सणाच्या काळात त्या लॉकरमधून घरी आणल्या जातात. दिवाळीचे 2-3 दिवस मजा करून झाली की या वस्तू कपाटात ठेवल्या जातात आणि मग कपाट लॉक करून आपण निश्चिंत मनाने फिरायला जातो. वर व्हॉट्सअप स्टेटसही ठेवतो. त्यामुळे आधीच जे आपल्या घरावर डोळा ठेवून असतात. अश्यांचे मोठ्ठे काम आपण करून जातो. म्हणूनच फिरायला जाण्याआधी घराची सुरक्षा करणे खूप गरजेचे आहे, नाहीतर चोरी झाल्यास खूप मोठा फटका बसू शकतो.

The thieving haddos ... no longer safe in the house
The thieving haddos ... no longer safe in the house

अशी घ्या खबरदारी

 - दिवाळी झाल्या झाल्या वेळ काढून आपल्या सोन्या चांदीच्या वस्तू  बँकेतील लॉकरमध्ये ठेवून द्या,  जर असे करणे शक्य झाले नाही तर घरातील सुरक्षित जागी ते कुलूप लावून नीट ठेवून द्या. त्याची चावी जातान सोबत न्या.  

- आपल्या प्रवासा़विषयी फेसबुक, इन्टावर माहिती देऊ नका. फक्त जवळच्या लोकांना तोंडी सांगा.

- व्हॉट्सअप स्टेटसला अजिबात अपडेट टाकू नका. 

- शक्य असल्यास घराला सीसीटिव्ही लावून तो चालू राहू द्या. 

- आपण फिरायला जाणार असल्याची कल्पना ज्यांच्याविषयी चांगली खात्री आहे, अशाच शेजाऱ्यांना सांगा. म्हणजेल ते घरावर लक्ष ठेवतील.

-मुख्य दरवाज्याबरोबर लोखंडी दरवाजा नीट बसलाय का ते चेक करा. 

- घर बंद आहे याचा मागमूस राहू नये यासाठी बाहेरच्या दांडय़ांवर कपडे तसेच वाळत राहू द्या. घराचे पडदे  नेहमी असतील तसेच राहू द्यात.

- आजकाल ऑटोमॅटिक टायमर लावून घरातील दिवे ठरावीक वेळेत चालू-बंद होतील अशीही सोय करता येते.

- मोठ्या घरातील दरवाजे जास्त सुरक्षित असतील यासाठी आधीच उपायोजना करा.  

- काळोखात चोरी होत असताना कोणाच्या सहसा लक्षात येत नाही. त्यामुळे घराच्या दरवाजाबाहेर आजूबाजूला रात्री प्रकाश असेल याची व्यवस्था करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()