घामाच्या दुर्गंधीपासून सुटका पाहिजे? या सात टिप्स फॉलो करा

या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या त्यामुळे तुम्ही अगदी सहजतेने घामापासून सुटका मिळवू शकतात.
 sweat odor
sweat odor sakal
Updated on

सध्या सगळीकडे उन्हाचा तडाखा सुरु झालाय. कडक उन्हामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्रत्येकजण उन्हाळ्यात विशेष काळजी घेत असतो. मात्र उन्हाळ्यातील घामामुळे येणारा दुर्गंधाच्या त्रासावर कुणाकडेच पर्याय नसतो. मग अंघोळ करणे, हा एकच पर्याय सुचतो. पण या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या त्यामुळे तुम्ही अगदी सहजतेने घामापासून सुटका मिळवू शकतात.(do following home remedies to avoid sweat odor)

 sweat odor
वैयक्तिक प्रवास कर्ज घ्या आणि मनसोक्त हिंडा

१. बेसन आणि दहीची पेस्ट शरीरावर लावा

आंघोळ करण्यापूर्वी बेसन आणि दही यांची पेस्ट तयार करून संपूर्ण शरीरावर लावावी. अर्ध्या तासानंतर चांगली आंघोळ करा. या लेपमुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे बाहेर काढण्याचा मार्ग तयार होतो. यामुळे आपल्या शरीरातून घामाचा वास येण्याची शक्यता कमी होते.

२. पुदीना

पुदिन्याची पाने उकळून आंघोळीच्या पाण्यात टाका. दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल.

३. व्हिनेगरचा वापर

व्हिनेगर हा एक नैसर्गिक जंतुनाशक पदार्थ आहे जो दुर्गंध पसरवणारे जीवाणू नष्ट करतो. एका स्प्रे बाटलीत पांढरा व्हिनेगर भरा आणि घाम येणाऱ्या भागात शिंपडा.

४. लिंबू वापरा

बादलीभर पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने आंघोळ करा, दुर्गंधी दूर होईल.

 sweat odor
महाराष्ट्र तापतोय; काय काळजी घ्याल ?

५. बेलची पाने

बेलची पाने सुकवून बारीक वाटून घ्या. या पावडरमध्ये काजू घाला आणि साबणाऐवजी वापरा. यामुळे शरीरातून दुर्गंध येणार नाही.

६. सुगंधित तेल

लॅव्हेंडर, पेपरमिंट आणि पाइन ॲपल तेल वापरा, यामुळे शरीराची दुर्गंधी कमी होते आणि सुगंध दोन-तीन दिवस टिकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.