कोरड्या त्वचेवर मेकअप करताना चुकूनही करू नका या गोष्टी

Do not do these things by mistake while applying makeup on dry skin kolhapur news
Do not do these things by mistake while applying makeup on dry skin kolhapur news
Updated on

कोल्हापूर :  मेकअपचे साहित्य खरेदी करताना आपण कोणतेही साहित्य घेऊन चालणार नाही. कारण प्रत्येक महिलेची त्वचा तेलकट किंवा कोरडी असते. त्यामुळे मेकअपचे साहित्य घेताना ही काळजी घेतली पाहिजे की आपली हे साहित्य आपल्या त्वचेला चालणार आहे का? त्वचेची प्रोडक्ट तयार करताना दोन्ही प्रकारच्या त्वचांचा विचार करून तयार केली जातात. त्यामुळे खरेदी करणाता पण महिलांनी काळजी घेतली पाहिजे. काही महिला मेकअपचे करताना ही काळजी घेत नाहीत. परंतु, काळजी नाही घेतली तर तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होऊन शकते. चला तर मग पाहूया कोरड्या त्वचेवर मेकअप करताना या चुका करू नका. 

हाइड्रेटिंग प्राइमरचा वापर

मेकअप करण्याआधी प्राइमर तुमच्या त्वचेला एक स्मूद बेस देते त्यामुळे प्राइम सुरूवातीला वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही प्रायमरचा वापर तरत नसाल तर ती तुमची  पहिली आणि सर्वात मोठी चूक करत आहात. प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या महिनांना प्राइम वापरणे आवश्यक आहे. परंतु, कोरडी त्वचा असणाऱ्या महिनांनी कधीही ही टिप विसरू नका. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर हाईड्रेटिंग प्रायमरची निवड केली पाहिजे. हे तुमच्या मेकअपला स्मूद तर बनवेलच परंतु, माॅश्चसाईचही करेल. ज्यामुळे तुमचा मेकअप फिकट दिसणार नाही. 

फाउंडेशनचा वापर करताना ब्रशचा वापर  

फाउंडेशन लावण्याच्या दोन सामान्य पध्दती आहेत.  ब्रश किंवा नम मेकअप स्पंजचा वापर केला जातो. परंतु, तुमची त्वचा कोरडी असेल आणि तुम्ही थंडीत मेकअप करत आहात तर फाउंडेशन लावण्यासाठी ब्रशचा वापर करू नका. त्याच्याएवजी तुम्ही स्पंजला थोड्या प्रमाणात ओला करून फाउंडेशन लावा. कोरड्या त्वचेला लिक्विड पद्धतीचे मेकअप प्रोडक्ट वापरणे चांगले असतात. हे वापरण्यासाटी स्पंजचा वापर करणे गरजेचे आहे. 

पूर्ण चेहऱ्यावर पावडरचा वापर

कोरडी त्वचा असणाऱ्या महिलांनी कधीही पूर्ण चेरऱ्यावर पावडरचा वापर करू नये. त्यामुळे त्यांची त्वचा अजून कोरडी दिसू शकते. चेहऱ्याच्या काही भागावरील तेलकट त्वचेवर पावडरचा वापर करू शकता.  

पाउडर ब्लशचा वापर

कोरडी त्वचा असणाऱ्या महिलांना पाऊडर बेस्ड मेकअपचे प्रोडक्ट वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, कोरडी त्वचा असणाऱ्या महिलांनी क्रिम बेस्ड प्रोडक्ट वापरले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही ब्लशचा वापर चीक्सवर करत असाल तर पाउडर ब्लशचा वापर करण्याची चूक करू नका. त्याच्याएवजी तुम्ही क्रिम ब्लशचा वापर करा. 

हाइड्रेटिंग मिस्ट

ज्या पद्धतीने कोरड्या त्वचेवर मेकअप करताना हाइड्रेटिंग प्राइमर वापरले गरजेचे असते त्याच प्रमाणे मेकअपच्या शेवटच्या स्टेजला हाइड्रेटिंग मिस्टचा वापर करणे गरजेचे आहे. मेअकपनंतर जर त्वचा कोरडी किंवा डल दिसत असेल तर हाइड्रेटिंग मिस्टचा नक्की वापर करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()