तुमच्या होणाऱ्या पार्टनरला 'या' सात सवयी असतील तर सावधान...

तुमच्या होणाऱ्या पार्टनरला 'या' सात सवयी असतील तर सावधान...
Updated on

सर्व लोकांमध्ये काहीना काही गुणदोष असतात. कोणीच परिपूर्ण नसतं. मिस्टर परफेक्टला शोधणं हा एक प्रवास आहे. त्यात वेगवेगळ्या स्वभावाची माणसे तुम्हाला भेटू शकतात. पण योग्य पार्टनर शोधताना तुम्हाला त्याच्या 7 सवयींची माहिती असणे गरजेचे आहे. त्याला या सवयी असल्यास त्याच्याबरोबर लग्न करण्याचा अजिबात विचार करू नका.

वचन न पाळणारा

तो अनेक आश्वासने देत असेल. पण, ती त्याला पाळता येत नसतील तर अशा माणसाबरोबर आयुष्य घालवायचे का? याबाबत पुर्नविचार करा. अशा माणसाला एक-दोन वेळा माफ केले जाऊ शकतो. पण असे रोजच होऊ लागले तर ते कठीण होऊन बसेल. काही लोकं तुम्हाला कदाचित मुर्ख बनवत असतील.

नियंत्रण ठेवत असेल तर

हे खा, ते घाल, अशी चाल, तु कुठे आहेस? असे प्रश्न तो तुम्हाला विचारतोय का? अशा प्रकारचे प्रश्न सुरवातीला विचारल्याने तो तुम्हाला काळजी करतो असे वाटेल. पण पुढे त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला त्याच्याबरोबर राहणे गुदमरण्यासारखे होईल. जर तो तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही अशा माणसाबरोबर आयुष्य काढू शकता का ते ठरवा.

दुय्यम वागणूक

सर्व नातेसंबधाचे मुळ हे देवाण-घेवाण, शेअरिंगमध्ये आहे. दोघांकडून ते अपेक्षित आहे. पण जर त्या माणसाचा अशा गोष्टींवर विश्वास नसेल तर त्याने तुमच्या आयुष्यातून निघून जाणे योग्य. प्रत्येक माणसाला त्याच्या वकुबाप्रमाणे चांगले मिळते. जोडीदारही त्यातला एक आहे. त्याने त्याच्या पालकांनंतर तुम्हाला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमच्या होणाऱ्या पार्टनरला 'या' सात सवयी असतील तर सावधान...
यशस्वी लग्नासाठी दोघांच्या वयामध्ये हवं किती अंतर?

सॉरी म्हणण्याचे नाटक

तो त्याच चुका पुन्हा पुन्हा करून सतत सॉरी म्हणतोय. सॉरी म्हणणे हा स्वल्पविराम किंवा विषय संपल्याचे लक्षण असू शकत नाही. पण त्याला त्याबद्दल खरच अपराधीपणाची भावना आहे का? तो हे पुन्हा पुन्हा करत असेल तर अशा वृत्तीच्या माणसासोबत राहाल का, असे तुम्ही मनाला विचारून नात्याचा पुर्नविचार केला पाहिजे.

तुमच्या मतांचा अनादर

सर्व माणसांमध्ये थोड्या-फार प्रमाणात इगो असतोच. पण तुमच्या मताची त्याच्या लेखी काहीच किंमत नसेल आणि तो तुम्हाला 'फ्रेंड्स' मधील जोय सारखा moo point प्रमाणे वागवत असेल तर पुन्हा विचार करा. तुमच्या मताला त्याच्या लेखी किंमत असली पाहिजे. त्याला काही गोष्टींमध्ये मध्यममार्ग किंवा सेटलमेंट करण्याची गरज वाटत नसेल, काही गोष्टीत सहमत नसेल. किेवा काही गोंष्टींवर चर्चाच करायची नसेल आणि सतत तुम्हाला कमीपणा दाखवत असेल तर अशावेळी स्वतःच्या प्रतिष्ठेचा आदर करा.

लबाड

जगात अनेक लबाड लोकं आहेत. त्यांच्याशी नात्यात राहणे म्हणजे विनाकारण ताण निर्माण करण्यासारखे आहे. कधीतरी खोटं बोललं तर समजू शकतो. पण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सतत खोटं बोलत असेल तर ते धोकादायक आहे.

सतत चिकटणे

सर्वांनाच पार्टनरची आश्वासक साथ हवी असते. त्याने वेळोवेळी काळजी घ्यावी असे वाटते. पण जर तुम्ही त्याच्याबरोबर 24 तास असाल, मित्र-मैत्रिणींसमोर तो एखाद्या लहान मुलासारखं वागत असेल. तुमच्या कुटुंबासाठी राखून ठेवलेली वेळही त्याला अमान्य असेल तर त्याच्याशी स्पष्ट बोला. तो तुमच्या स्पेसला धक्का देत असून असे सारखे चिकटणे योग्य नाही, हे स्पष्ट सांगा. जर तो तुम्ही सांगताय त्याप्रमाणे वागला, तर ठीक आहे. नाहीतर अशा माणसासोबत चार हात लांब राहणेच योग्य.

तुमच्या होणाऱ्या पार्टनरला 'या' सात सवयी असतील तर सावधान...
Bridal Tips : ओव्हरसाईज मुलींनी लग्नात लेहेंगा खरेदी करताना घ्यावी ही काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.