Holi 2024: होळीचे रंग खेळताना चुकूनही घालू नका 'असे' ड्रेस, अन्यथा ...

Holi Dress Idea: तुम्हीही होळीचे रंग खेळताना कपड्यांबाबत सावधगिरी बाळगली पाहीजे. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Holi Dress Idea
Holi Dress IdeaSakal
Updated on

do not wear these clothes while playing holi

दरवर्षी होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार यंदा होलिका दहन 24 मार्चला साजरी होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन साजरा केला जाणार आहे. भारतात हा सण मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला जातो.

अनेक लोक फुलांनी होळी खेळतात, तर अनेकजण आपल्या घरी रंग आणि गुलालाची होळी पार्टी करतात. अनेक ठिकाणी भडक रंगांनी होळी खेळली जाते. हे रंग काढणे देखील खूप कठीण आहे.

पक्क्या रंगांनी होळी खेळताना कपड्यांची काळजी घेणं देखील खुप गरजेचं आहे. कारण पाण्यात पक्के रंग मिक्स करून होळी खेळली जाते. जर तुम्ही अशा पार्टीला जात असाल जिथे पाण्याच्या रंगांनी होळी खेळली जात असेल तर कपड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • पारदर्शक कपडे

होळी पार्टीसाठी पारदर्शक कपडे घालणे टाळावे. कारण पाण्याचे रंग खेळल्याने ते कपडे अंगाला चिकटतात. यामुळे तुम्हाला स्वत:ला अस्वस्थ वाटेल. यामुळे सुती कपडे घालून होळी खेळावी.

  • साडी

होळी पार्टीत अनेक महिलांनी साडी नेसण्याचा विचार करतात. पण असे केल्याने तुमचा संपूर्ण लुक खराब होऊ शकतो. तुमच्यावर कोणी पाणी टाकले तर साडी अंगाला चिकटू शकते, त्यानंतर तुम्हाला अवघडल्यासारखे वाटू शकते. यामुळे साडी नेसणे टाळावे. तुम्ही ज्या कपड्यांमध्ये आरामदायी असाल त्याच कपड्यांची निवड करावी.

  • जास्त घट्ट कपडे

होळीचे रंग खेळायला जात असाल तर जास्त घट्ट कपडे घालणे टाळा. यामुळे ओले कपडे तुमच्या शरीराला चिकटून राहतील, ज्यामुळे तुम्हाला इंफेक्शन होऊ शकते.

Holi Dress Idea
Holi 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर ‘या’साठी घालतात पांढरी कपडे, थेट राहूशी आहे कनेक्शन ?
  • जुने कपडे

तुम्ही होळीचे रंग खेळण्यासाठी खुपच जुने कपडे घालत असाल तर होळी खेळताना फाटू शकतात. यामुळे होळी खेळण्याचा तुमचा आनंद खराब होऊ शकतो. तसेच कधी कधी कपड्यांची शिलाई देखील निघून जाते. यामुळे कपड्यांची निवड करताना काळजी घ्यावी.

  • स्लिवलेस ड्रेस

होळी खेळताना नेहमी स्लिवलेस कपडे घालणे टाळावे. कारण यामुळे रंग थेट त्वचेच्या संपर्कात येऊन इंफेक्शन होऊ शकते. यामुळे होळी खेळताना फुलबाहीचे कपडे घालावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.