Health Care News : जेवणानंतर करा 'ही' योग मुद्रा, गॅस व अपचनची समस्या होईल दूर

पोट साफ होण्यासाठी हातांची ‘ही’ मुद्रा करुन पाहाचं
Health Care News : जेवणानंतर करा 'ही' योग मुद्रा, गॅस व अपचनची समस्या होईल दूर
Updated on

हिवाळ्यात बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात. जर तुम्हीही हिवाळ्यात पोटाशी संबंधित आजारांनी त्रस्त असाल तर तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हे योगासन रोज करा. अशी अनेक आसने आहेत, जी निरोगी राहण्यासाठी वर्षानुवर्षे केली जातात. त्यामुळे आजारांपासून दूर राहण्यासाठी रोज योगासने करण्याचा सल्ला दिला जातो. यापैकी एक आहे पूषण मुद्रा.

ही हाताची मुद्रा सहसा नृत्य, चित्रकला किंवा शिल्पकलेमध्ये वापरली जातात. परंतु तुम्हाला माहित आहे का की मुद्रांचे एक विशेष सांस्कृतिक महत्त्व आहे आणि त्यांचे आरोग्य फायदे देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा आसनाबद्दल सांगत आहोत ज्याचे वज्रासनात बसून केल्याने अनेक फायदे होतात.

Health Care News : जेवणानंतर करा 'ही' योग मुद्रा, गॅस व अपचनची समस्या होईल दूर
Papaya Side Effects : 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये पपई, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान

पुषन मुद्रा करण्याची पद्धत

हे आसन करण्यासाठी जमिनीवर गुडघे टेकून बसा.

तुमची पाठ आणि डोके सरळ ठेवा.

तुम्ही करंगळी आणि अंगठ्याचे बाजूचे बोट सोडून मधली दोन बोट अंगठ्याजवळ आणा.

आता तुम्ही मधली दोन्ही बोटांनी अंगठ्याला हळूवारपणे दाबा. पण बाजूची दोन्ही बोटं एकदम सरळ ठेवा.

आता तुम्ही मांडी घालून बसा आणि अपान मुद्रा अवस्थेत हात गुडघ्यावर ठेवा. यात हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवा. आता मुद्रा अवस्थेतील बोटांची मांडणी नीट ठेवा

हात आणि संपूर्ण शरीराला आराम वाटू द्या.

सामान्यपणे श्वास घ्या आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.

पुषन मुद्राचे फायदे

श्वसनाच्या समस्या दूर होतात.

बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि गॅस सारख्या पचनाशी संबंधित समस्या दूर करते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.

तणाव कमी होतो.

पेल्विक स्नायूंना बळकट करते.

मासिक पाळी संबंधित समस्या दूर करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.