General knowledge : सध्या अख्ख जग डिजिटल झालं त्यामुळे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन कसं करता येईल, याचा विचार आपण नेहमी करतो. यात ऑनलाईन पेमेंट महत्त्वाचा विषय असतो. ऑनलाईन कोणतेही आर्थिक व्यव्हार असो आपण मग ऑनलाईन पेमेंट ॲप वापरतो.
यात Paytm सारख्या ॲपचा सर्वाधिक वापर केला जातो पण तुम्हाला याच Paytm चा फुल फॉर्म माहितीये का? 99 टक्के लोकांना माहिती नाही पण आज आम्ही तुम्हाला याचा फुल फॉर्म सांगणार आहोत. (do you know full form of paytm which is used for online payment)
Paytm हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. Paytmमुळे अनेक आर्थिक व्यव्हार ऑनलाईन करण्यास सोपी जातं. ऑनलाइन शॉपिंग, मोबाइल DTH रिचार्ज, डाटा रिचार्ज, ब्रॉडबँड, वीजेचं बिल भरणे, लँडलाइनचे बिल भरणे, टॅक्सी सर्विसचं बिल भरणे, मनी ट्रांसफर इत्यादी कामे सहज paytm मुळे शक्य होतात.
2010 मध्ये पेटीएम लॉन्च करण्यात आले होते तेव्हा सुरवातीला रिचार्ज आणि अन्य सुविधा पेटीएम द्यायचे पण जसा जसा काळ गेला तसा तसा पेटीएम ने आपल्या सुविधांमध्ये वाढ केली.
Paytm चा फुल फॉर्म
Paytm हा शब्द आपण दररोज उच्चारतो पण अनेकांना Paytm चा फुलफॉर्म माहिती नसतो. अनेकजणांना Paytm शब्द उच्चारताना हा शॉर्ट फॉर्म आहे, हे सुद्धा कळत नाही. Paytm चा फुलफॉर्म आहे " Pay Through Mobile" म्हणजेच मोबाईल द्वारा पे करा पण आपण हा फुल फॉर्म कधीच वापरत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.