Burqa Fashion: अबब! एक बुरखा पण त्यातही असतात एवढ्या स्टाईल...

मुस्लिम लोक बुरख्याला महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे साधन मानतात.
Burqa Fashion
Burqa Fashionesakal
Updated on

Burqa Fashion: इस्लामिक संस्कृतीत हा स्त्रियांचा बाह्य पोशाख आहे. सामान्य जग आणि स्त्रीमध्ये एक पडदा असावा आणि लोकांनी तिच्याकडे वाईट नजरेने बघू नये यासाठी हा बुरखा घालण्याची प्रथा आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी हा पडदा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अरबी देश आणि उपखंडात बुरखा परिधान करणं सामान्य आहे.

Burqa Fashion
Muslim Marathi Sahitya Sammelan | मुस्लिमांनो, फूट पडू देऊ नका! : हुसेन दलवाई यांचे आवाहन

जगभरातल्या मुस्लीम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात, मग तो हिजाब असो, नकाब किंवा बुरखा. यातला फरक सामान्यतः लक्षात येत नाही, म्हणजे कुठला पूर्ण चेहरा झाकतो, कुठला फक्त डोक्यावरून घेतला जातो, आणि कशात डोळ्यांवर जाळी असते.

Burqa Fashion
Muslim Marriage : मुस्लिम लग्नाबाबत केंद्राला नोटीस

मुस्लिम समाजातील महिला घराबाहेर पडताना बुरखा अनिवार्यपणे परिधान करतात. मुस्लिम लोक बुरख्याला महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे साधन मानतात. बुरखा ही प्रथा नाही, तो इस्लामिक पोशाख आहे. बुरखा घालणे ही कोणत्याही स्त्रीवर लादली जाण्याची सक्ती नाही, तर इस्लामची शिकवण जाणणारी महिलाच स्वतः बुरखा वापरते असं मत आहे.

Burqa Fashion
Love Jihad : मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्यांचा दबाव; तरूणाची राहत्या घरी आत्महत्या

बुरखाचे वेगवेगळे प्रकार:

हेडस्कार्फचे आणि परिधान करण्याचे प्रकार आहेत; जाणून घेऊया त्यांच्याबद्दल

Burqa Fashion
Burqa Fashionesakal

1. हिजाब (Hijab)

तसं तर 'हिजाब'चा शब्दशः अर्थ हा कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरूण घालणे, असा आहे. पण आता हिजाब म्हटलं की लगेच मुस्लीम स्त्रिया डोक्यावरून घेतात तो स्कार्फ डोळ्यांसमोर येतो. हिजाब वेगवेगळ्या रंगात आणि अनेक स्टाईल्समध्ये येतो. पाश्चात्त्य देशांमध्ये जे हिजाब सर्वाधिक दिसतात ते डोकं आणि गळा पूर्णपणे झाकतात, पण चेहरा स्पष्टपणे दिसतो.

Burqa Fashion
Fashion : मुलींनो आज ट्राय करा सेलिब्रिटींच्या या फॅशन स्टाइल
Burqa Fashion
Burqa Fashionesakal

2. नकाब (Niqab)

नकाब चेहऱ्यासाठीचा एक पदर असतो, ज्यात डोळ्यांभोवतीचा भाग उघडा असतो. तो स्वतंत्रपणे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरतो येऊ शकतो, किंवा त्याला हिजाबच्या सोबतीनेही घालता येतं.

Burqa Fashion
Fashion Tips : एखाद्या परीप्रमाणे दिसायचं आहे? हॅरी पॉटरचा 'हरमायणी'चा पार्टी लुक नक्की ट्राय करा
Burqa Fashion
Burqa Fashionesakal

3. बुरखा (Burqa)

मुस्लीम महिला सर्वांत जास्त झाकलेल्या असतात त्या बुरख्यात. डोक्यापासून पायांपर्यंत, असं अख्खं शरीर झाकलेलं असतं आणि फक्त डोळ्यांसमोर येणाऱ्या भागावर एक जाळी असते.

Burqa Fashion
Fashion Tips : आउटफीटनुसार योग्य ते सॉक्स घाला, नाहीतर इंप्रेशन होणार...
Burqa Fashion
Burqa Fashionesakal

4. इतर प्रकार

बुरख्याचे अजूनही काही प्रकार असतात, पण भारतात ते तितके चर्चेत नाहीत. जसे की अल-अमिरा (Al-Amira), शायला, खीमार आणि चादोर. हे बहुतेक स्कार्फचे वेगवेगळे प्रकार असतात, जसे की अल-अमिरा मध्ये एक पॉलीस्टरपासून बनलेली घट्ट बसणारी टोपी, आणि झोळीसारखा स्कार्फ असतो तर इतर प्रकार हे ओढणीसारखे फक्त लांबी अन् रुंदीने लहान किंवा मोठे असतात.

Burqa Fashion
Men's Fashion: ब्लेझर घेताय? पुण्याच्या या ठिकाणी आहे १ हजारापर्यंतचे बेस्ट ऑप्शन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.