आज जगात कोरियन लोकांची लाइफस्टाइल फॉलो करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचं दिसणं, त्यांचे पदार्थ, त्यांचे सिनेमे हे सगळं आपल्या जगण्याचा भाग झाला आहे. पण कोरियन लोकांची (korean Lifestyle) लाइफस्टाइल फॉलो करायची असेल तर त्यांच्यासारखं शिस्तीचं वागणं आपल्याला जमेल का ते एकदा स्वत:ला विचारून बघा.
कोरियन लोकं आरोग्यदायी जगण्यावर (Healthy Lifestyle) भर देतात. त्यासाठी ते नियमित व्यायाम, योग्य आहार आणि गुणवत्तेवर भर देतात. त्यामुळे ही लोकं अंगकाठीने बारीक असली तरी हेल्दी असतात. म्हणूनच मग त्यांच्यासारखं जगणं साध्य करायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
व्यायामावर भर (Regular Exercise)
कोरियन लोकं घरगुती जेवणाला (Homemade Food) प्राधान्य देतात. तसेच व्यायामावर त्यांचा भर जास्त असतो. भरपूर चालणे त्यांना आवडते. जास्तीत जास्त चालून वजन योग्य राखणे त्यांना आवडते. यासोबतच ते उच्च कॅलरी, चरबी असलेले पदार्थ खात नाहीत. त्यामुळे फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा असे फॅटी पदार्थ ते नियमित खात नाहीत. हे पदार्थ खाणे कमी केले तर लठ्ठपणा नाहीसा होईल. तसेच दिर्घकालीन आजारांपासून बचाव होईल. या गोष्टी पाळत असल्याने कोरियन लोकं अधिक तंदुरूस्त असतात.
आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश (Eat Veggies)
कोरियन लोकं हेल्दी राहण्याचे कारण म्हणजे ते आहारात मुबलक भाज्यांचा (Vegetables) वापर करतात. बहुतेक भाज्या तंतुमय, आरोग्यदायी आणि कमी कॅलरी असलेल्या असतात. मटण आणि तळलेले चिकन हे त्यांना आवडत असले तरी हिरव्या, ताज्या भाज्या खाण्यावर त्यांचा भर असतो. भाज्यांमधील पोषक तत्वांमुळे कॅलरी आणि चरबी कमी होते.त्यामुळे या भाज्या खाल्ल्यान त्यांचे वजन कमी होते.
पचनास योग्य पदार्थ खाण्यावर भर
कोरियन जेवणात किमची या पारंपारिक पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. कोबी, मुळा आणि हिरवा कांदा आणि मीठ, साखर, कांदे, आले, लसूण आणि मिरची यांसारख्या विविध मसाल्यांनी तयार केलेला हा पारंपारिक कोरियन पदार्थ आहे. तो आंबवलेला असतो. आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे पचनही व्यवस्थित होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तसेच वजन कमी करायला मदत करतात.
मासांहार करा पण फक्त मासे खाऊन
जर कोरियन लाइफस्टाइल (Korian Lifestyle) फॉलो करायची असेल तर चमचमीत चिकन, मटण खाणे सोडावे लागेल. त्याएेवजी सीफूड, मासे खाण्यावर भर द्यावा लागेल. सीफूड हे कोरियामधील मुख्य खाद्यपदार्थांपैकी एक आहे. फॅटी माशांच्या व्यतिरिक्त, विविध माशांचे पदार्थ नेहमीच्या जेवणात असतात. समुद्र शेवाळ त्यांना आवडतं. त्यात जीवनसत्वे, खनिज आणि फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होते. तसेच पोट भरल्यासारखे वाटते. वारंवार भूक लागत नसल्याने वजनही वाढत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.