Women's Fashion Tips: पन्नाशीनंतरही माधूरीसारखं दिसायचंय स्टायलिश? मग या टिप्स नक्की फॉलो करून पाहा

मुलींना फॅशनच्या बाबतीत नेहमीच अव्वल राहायचे असते
Fashion Tips
Fashion Tipssakal
Updated on

मुलींना फॅशनच्या बाबतीत नेहमीच अव्वल राहायचे असते, त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आउटफिट कलेक्शन असतात. फॅशनचं ट्रेंड दरदिवशी बदलत असते. अशात ट्रेंडीग फॅशनमध्ये स्वत:ला अपडेट ठेवणे खूप गरजेचं असतं. प्रत्येकाला सुंदर आणि वेगळं दिसण्याची इच्छा असते.

यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन टिप्स देखील फॉलो करतात. मात्र वाढत्या वयासोबत फॅशन करणे आणखी कठीण होतं.

पन्नाशीनंतर फॅशनेबल ट्रेंडला फॉलो करणे हे एक आव्हान असतं. पण काही टिप्स फॉलो करुन तुम्ही कोणत्याही वयात स्टायलिश दिसू शकता. चला तर जाणून घेऊया या टिप्स. 

Fashion Tips
Kitchen Hacks: सकाळी स्वयंपाकाची घाई होतेय? मग या टिप्स वापरा आणि लवकर आवरा

रेड लिपस्टिकचा वापर करा


बोल्ड लुक आपल्या फॅशनला हॉलीवुड इफेक्ट देतो. जर तुम्ही तुमच्या फॅशन मध्ये रेड लिपस्टिकचा समावेश कराल तर तुमचा लुक खूप सुंदर दिसू शकतो. रेड लिपस्टिक तुमच्या चेहऱ्यावर तेज आणते.

Fashion Tips
Fashion Tipssakal

स्टायलिश आणि मोठ्या नेकलेसचा वापर करा


तुम्ही अनेकदा पार्टींमध्ये सेलिब्रिटींना मोठमोठे नेकलेस घातलेले बघितले असेल कारण असे नेकलेस तुमच्या लुकला अधिक आकर्षित बनवतात. स्टायलिश नेकलेस सहसा लोकांच्या नजरेत येतात. त्यामुळे स्टायलिश नेकलेस आवडीने घाला.

Fashion Tips
Fashion Tipssakal

पांढऱ्या रंगाची पॅंट घाला


ब्लॅक पँट खूप जूना फॅशन ट्रेंड आहे. जर तुम्हाला हजारो लोकांमध्ये उठून दिसायचंय तर काळ्या पँट ऐवजी पांढरी पँट घाला. तुम्ही पांढऱ्या रंगाची जीन्स किंवा बेल बॉटम पँटपण घालू शकता.

Fashion Tips
Fashion Tipssakal
Fashion Tips
Glowing Skin Tips: चेहऱ्यावर झटपट ग्लो हवाय? मग ट्राय करा हे फेसपॅक

प्लेन शर्ट किंवा ब्लाउज घाला


स्टाइलिश सेट मध्ये पांढऱ्या रंगाचा सेट असणं गरजेचं आहे. पांढरं शर्ट किंवा ब्लाउज तुम्हाला अभिनेत्रीसारखा लूक देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.