Doctors day 2023: महिलांनी दवाखान्यात यावं म्हणून रखमाबाईंना शेळीचं बाळंतपण करावं लागलं!

डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील?
Doctors day 2023
Doctors day 2023esakal
Updated on

Doctors day 2023: डॉक्टरकीची पदवी मिळवून प्रत्यक्ष प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होण्याचा मान रखमाबाई राऊत यांना मिळाला. कारण, डॉ. आनंदीबाई जोशी डॉक्टर झाल्या, परंतु लगेचच आजारपणात त्यांचा मृत्यू झाल्याने त्या डॉक्टरकी करू शकल्या नाहीत. रखमाबाईंनी मात्र डॉक्टरकी पदवी घेतली आणि ती रूग्णांची सेवाही केली.

आज डॉक्टर्स डे आहे. त्यानिमित्तानेच रखमाबाई राऊत यांच्या संघर्षाच्या, त्यांनी दिलेल्या लढ्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.

रायबहादूर’ आणि 'जस्टिस ऑफ पीस’ असणाऱ्या हरीशचंद्र यादवजी यांच्या घरी रखुमाबाई राऊत यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी झाला. रखमाबाई यांच्या आई जयंतीबाई या वयाच्या सतराव्या वर्षी विधवा झाल्या. या घटनेनंतर रखमाबाईंनी आईचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई या जयंतीबाई यांची पहिल्या पतीपासूनची मुलगी होय. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते.

Doctors day 2023
Doctor : डॉक्टरांना बनविले चक्क कारकून!

रूढीनूसार रखमाबाईंचा बालविवाह वयाच्या नवव्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्यासोबत झाला होता. रखमाबाईंचे प्रथम पती - दादाजी भिकाजी ह्यांच्या आईनं हरिश्चंद्रजींकडून 'जयंतीबाईंच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी करून दे', असं वचन घेतलं होतं.

त्याप्रमाणे रखमाबाईंचा विवाह पार पडला. पण हा विवाह संपन्न व्हायला रखमाबाईंचे वडील डॉ. सखाराम अर्जुन यांनी एक अट घातली. ती अशी की, रखमाबाईंचा बालविवाह झाला असला तरी वयाच्या १६ व्या वर्षीच त्या सासरी जातील. त्या अटीनुसार रखमाबाईंना १६ व्या वर्षीच सासरी धाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यानच्या काळात रखमाबाईंचे पती दादाजी व्यसनांच्या आहारी गेले होते. त्यांना दम्याचा विकार जडला होता. आर्थिक बाबीत ते त्यांच्या मामांवर अवलंबून होते. हे सगळं लक्षात घेऊन रखमाबाईंनी सासरी जाण्यास नकार दिला.

एका स्त्रीकडून आलेला नकार तसेच रखमाबाईंच्या नावे असलेली इस्टेट, ह्या कारणांकरता त्यांनी बायकोला सासरी पाठवावे, असा कोर्टात दावा ठोकला होता. पण, आई-वडिलांच्या पाठींब्यामुळे त्यांनी हा खटला लढला.

Doctors day 2023
Whatsapp आता 'Eye Doctor' बनणार! करेल आय टेस्टींग, आतापर्यंत 1100 लोकांचं यशस्वी परीक्षण.....

रखमाबाईंचा शिक्षणाचा प्रवास

रखमाबाईंनी परदेशात जाऊन भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतलं. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं.

वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow' ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्हेनं उत्तीर्ण झाल्या.

'Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons' ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झालं.

रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आलं.

Doctors day 2023
National Doctor Day: तिसऱ्या लाटेत मुलांवरील धोका टाळणे शक्य

शेळीच्या बाळंतपणापासून समाजसुधारणेची पायाभरणी

सुरतेत करायची होती. आधी तर अनेक स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती. परंतु ती झपाटलेली असल्याच्या गोष्टी पसरल्या होत्या.

तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं.

रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमचं मुख्य कार्य होतं.

महिला परिषदेचे अध्यक्षपद

सुरतेला असताना रमाबाई रानडेंनी अध्यक्षपद भूषवलेल्या १९०७ च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचं कार्य लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आलं.

Doctors day 2023
National Doctors' Day : भारतात आज का साजरा होतो राष्ट्रीय डॉक्टर्स डे? जाणून घ्या महत्व

रखमाबाईंचा लाखमोलाचा सल्ला

'बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात' हे तत्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणाऱ्या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल. असा सल्ला रखमाबाईंनी भावाच्या सुनेला लिहीलेल्या पत्रात लिहीला आहे.

स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकंच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी अारोग्यविषयक व्याख्यानं घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती.

‘द हिंदू लेडी’

रखमाबाईंनी 'द हिंदू लेडी' ह्या नावानं इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये अनेक विषयांवर पत्र लिहिली. 'बालविवाह', 'सक्तीचे वैधव्य' 'पडदापद्धत' अश्या काही विषयांवरही त्यांनी लिहिलं. 'हिंदू लेडी'च्या ह्या पत्रांनी खळबळ माजली. रखमाबाई आणि दादाजी यांचा खटला गाजलाच परंतु वाईटातून चांगलं निष्पन्न होतं, ह्या न्यायानं, लेडी डफरिन, लेडी रे आणि मिसेस ग्रँट डफ, ह्यांनी हिंदू लेडीला साहाय्य केलं.

स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचं महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या. डोळ्यांनी दिसणं अगदीच कमी झालं तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवानं रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.

देश पारतंत्र्यात असताना भारतात समाजसुधारक आणि स्वातंत्र्यवीर यासारखे दोन गट पडले होते. त्यातील समाजसुधारकांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र देश स्वातंत्र्य होण्यासोबतच समाज अनेक रूढी परंपरामधून बाहेर पडून मोकळा श्वास घेऊ शकला तो केवळ डॉ.रखमाबाई राऊत यासारख्या समाजासाठी आयुष्य वाहणाऱ्या समाज सुधारकांमुळेच.

आज महिला सुदृढ आहेत त्या जन्माला घालणरे बाळही आज सुखरूप जन्म घेते. पण, एकेकाळी भारतात भूकबळी, पोलिओ यासारख्या आजारांनी थैमान घातले होते. त्याकाळी महिलांना सुदृढ ठेवण्याचे तसेच महिलांना जागरूक करण्याचे काम रखमाबाई यांनी केले. त्यांच्या या शौर्याला आणि कार्याला माझा सलाम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.