Kitchen Hacks : आपल्यापैकी बहुतेकजण जण भाड्यांची कोटिंग निघाली किंवा भांडी झिजल्यानंतरही बदलत नाहीत आणि त्यात स्वयंपाक करत राहतात. पण असे करणे आरोग्यासाठी विशेषतः महिलांसाठी खूप हानिकारक असू शकते. पोषणतज्ञ आणि योगाचार्य जुही कपूर यांच्या मते, खराब झालेले नॉन-स्टिक किंवा टेफ्लॉन कोटिंग असलेली भांडी आणि कास्ट आयर्न भांडी जास्त काळ वापरल्याने महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या होऊ शकते.
महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हार्मोनल असंतुलनामुळे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी, मासिक पाळी दरम्यान तीव्र क्रॅम्प, PCOS, वंध्यत्व, थायरॉईड यासह इतर अनेक आरोग्य समस्या देखील महिलांमध्ये दिसून येतात. हल्ली महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या खूप सामान्य झाली आहे, हार्मोनल असंतुलनाचे एक कारण नॉनस्टिक लेयर निघाल्यानंतरही त्यात जेवण बनवणे. जुही कपूरने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सविस्तर सांगितले आहे की कोटिंग निघालेल्या खराब झालेल्या भांड्यांमुळे तुमच्या शरीरातील हार्मोनल संतुलनावर कसा परिणाम होतो.
डॅमेज कोटिंगच्या भांड्यात जेवण बनवल्यास, ती कोटिंग तुमच्या जेवणातही मिसळू शकते. भाड्यांवरील कोटिंगमध्ये धोकादायक केमिकल्स असतात. अशा जेवणाचे सेवन केल्यास ते एंड्रोक्राइन डिसरप्शनचे कारण ठरू शकते. याच कारणाने हल्ली महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाच्या समस्या वाढत चालल्या आहेत.
याव्यतिरिक्त, एकदा टेफ्लॉन कोटिंग खराब झाल्यावर किंवा हाय फ्लेमवर गरम केल्यावर ते हानिकारक केमिकल्स सोडते. त्यामुळे आरोग्याला बऱ्याच प्रकारे धोका पोहोचू शकतो. टेफ्लॉनमधून बाहेर पडणाऱ्या काही रसायनांच्या संपर्कात आल्याने महिलांच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. (Hormonal Imbalance)
हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आणि संभाव्य जोखीम कमी करण्यासाठी, नॉनस्टिक कुकवेअर काळजीपूर्वक वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर त्यांचे कोटिंग खराब होत असेल तर ते त्वरित बदला. आरोग्यविषयक धोका टाळण्यासाठी हाय फ्लेमवर स्वयंपाक बनवताना स्टेनलेस स्टील किंवा लोहापासून बनविलेले कुकवेअर वापरा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.