प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जातो. वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणून एक उत्सव साजरा केला जातो त्याला दसरा म्हणतात. दसऱ्याला शुभ मुहूर्त मानला जातो. कारण या दिवशी एखादी गोष्ट खरेदी करणे फायद्याचे ठरते.
पौराणिक मान्यतांनुसार दसऱ्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला. तर दुर्गा मातेने महिषासुरासारख्या दुष्ट राक्षसाचा वध केला. म्हणजे असत्यावर सत्याचा विजय झाला. त्यामुळेच दसऱ्याला असाधारण महत्त्व आहे. (Dussehra Astro Tips In Marathi)
दसऱ्या दिवशी सकाळी प्रसन्न वातावरण असते. रांगोळी, तोरण यांनी घर सजलेलं असतं. घरात गोड पदार्थाचा नैवेद्य असतो. तर आपल्या ग्रामदेवता, कुलदेवता यांना नैवेद्य दाखवण्यासाठी लगबग असते. अशा या शुभ दिनी काही गोष्टी केल्याने तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते.
शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करू नयेत. कारण या गोष्टी केल्याने या शुभ दिनाचे फल तुम्हाला मिळत नाही. उलट याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. अशा कोणत्या गोष्टींच्या दसऱ्या दिवशी न केलेला बऱ्या हे जाणून घेऊया.
लहान असो किंवा थोर सर्वांचाच आदर केला पाहिजे. पण घरात असलेल्या वृद्ध आणि लहानांना नेहमीच आपण टोमणे मारत असतो. त्यांचा अपमान करत असतो. पण दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ही चूक करू नका. दसरा म्हणजे शुभ दिन. या दिवशी दुष्ट रावणाचा वध झाला म्हणजे वाईट विचारांचा वध झाला. रावणाने हनुमंताचा श्रीरामांचा माता सीतेचा अपमान केला. आणि तो श्रीरामांच्या हातून मारला गेला. त्यामुळे तुम्ही कोणाचाही अपमान करू नका.
दसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस शुभ असतो. पण तरीही एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी या दिवशी मुहूर्त पहा. योग्य मुहूर्त साधून तुम्ही घरातून बाहेर पडाल तर तुमचे काम तडीस जाईल. अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.
दसऱ्या दिवशी सर्वात महत्त्वाचं काम असतं आपलं घर सजवणे. प्रभू श्री राम यांनी रावणाचा वध केला म्हणजे त्याच्या जाचातून सर्व लोकांना सोडवलं. त्यावेळी लोकांनी विजय उत्सव साजरा केला. त्यांनी घराला तोरण बांधलं, दारात रांगोळी काढली, त्यामुळे घर सजवा आणि घरामध्ये पसारा करू नका.
या गोष्टीचे दुसरी बाजू अशी, दसरा हा माता लक्ष्मी चाही महत्वाचा दिवस म्हटला जातो. ज्याच्या घरी स्वच्छता असते त्याच्या घरी लक्ष्मी नेहमी वास करते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही या दिवशी घराची स्वच्छता नक्की करा.
तुमच्या नकळत तुम्ही कोणाला त्रास देत असाल तर याकडे कटाक्षाने लक्ष द्या. म्हणजे तुम्ही दसऱ्या दिवशी कुठल्याही प्राण्याला, पक्षांना, किडे, मुंग्या, व्यक्ती यांना त्रास देऊ नका. देव कोणाच्याही रूपात येऊ शकतो त्यामुळे तुम्ही सदैव समाधानी मनाने या गोष्टीचा सामना करा.
दसऱ्या दिवशी सुट्टी असते त्यामुळे काही लोकं पेंडिंग पडलेली कामे करतात. यामध्ये झाडांची देखभाल,अन् नको असलेली झाडे कापणेही असते. तुम्ही नवी झाडे लावू शकता. पण हे लक्षात घ्या की नवी गोष्ट करताना जुनी गोष्ट सोडू नये. घरात असलेली किंवा मनात असलेली मोठी झाडे तोडू नका. उलट आणखी नवीन झाडे आणून लावा. याचे शुभ फळ तुम्हाला नक्की मिळेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.