सेवेवर निष्ठा

एनआयव्हीनंतर कोरोना निदान करण्यासाठी जेव्हा आम्हाला प्रयोगशाळेची परवानगी मिळाली. तेव्हा खूप सारे प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहिले.
Dr. Suvarna Joshi
Dr. Suvarna JoshiSakal
Updated on

- डॉ. सुवर्णा जोशी

आरटीपीसीआर चाचणी ही कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही यासाठी केली जाते. राज्यात राष्ट्रीय विषाणू संस्थेनंतर (एनआयव्ही) कोरोना निदानास परवानगी मिळालेली प्रयोगशाळा होती बीजे वैद्यकीय महाविद्यालयाची. त्यामध्ये काम करणाऱ्या महिला म्हणजे डॉ. सुवर्णा जोशी. त्यांनी सांगितलेली प्रेरक कहाणी...

आरटीपीसीआर चाचणी करायचे असे डॉक्टरांनी सांगितले, की सगळ्यांच्याच मनात धडकी भरत होती. त्यातही रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत असे सांगण्यात आल्यानंतर रुग्णांची; तसेच नातेवाईकांची परिस्थिती पाहून त्यांना समजावून सांगणे हे एक आव्हानच होते.

एनआयव्हीनंतर कोरोना निदान करण्यासाठी जेव्हा आम्हाला प्रयोगशाळेची परवानगी मिळाली. तेव्हा खूप सारे प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहिले. कसे होणार? काय करता येईल? मात्र, एक डॉक्टर असल्याने युद्धकालीन परिस्थितीला सामोरे जावे लागणारच आहे, हेही माहिती होते. मात्र एक शास्त्रज्ञ असल्याने अनेक यापूर्वी अनेक साथींच्या आजारात काम केल्याने मी मानसीक दृष्ट्या हे आव्हान स्विकारण्यासाठी तयार होते.

मी प्रयोगशाळेत काम करण्याबद्दल होकार कळवला. त्यावेळी इतर सहकाऱ्यांनी इतर वरिष्ठांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

आव्हानात्मक परिस्थिती

कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती घाबरलेली होती. सगळीकडे चिंतेचे वातावरण होते. आपल्या घरातील व्यक्तीचे आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, यावर कोणाचा विश्वास बसत नसे. कधीकधी तर पुन्हा एकदा चाचणी करून पाहता का अशा विनवण्या करत असत.

त्या वेळेला त्यांना आधार देणे, समजावून सांगणे हे नक्कीच आव्हानात्मक होते. एका सॅंपलची तपासणी करून त्याचा अहवाल देण्यासाठी साधारण आठ तास लागत होते. नागरिकांना यावर विश्वास बसायचा नाही. रुग्णांच्या नातेवाइकांना समजावून सांगणे ही सर्वांत मोठी कसोटी होती.

घरची जबाबदारी आणि मदत

मी एक शास्त्रज्ञ आहे, त्यामुळे मला रुग्णांच्या मदतीला सदैव तयार राहावे लागते. मी घरातही एका डॉक्टरची जबाबदारी पार पाडते. घरातही एक रुग्ण असल्यानं त्यांची जबाबदारी माझ्यावर एक सून; माझ्या सासूबाईंना विस्मृती व पक्षाघाताचा आजार आहे. मला घरातली कामे आवरून प्रयोगशाळेतील जबाबदारीदेखील सांभाळावी लागत होती. कोरोनाची परिस्थिती बघता घरात कोणालाही कामाला ठेवता येत नव्हते.

त्यामुळे सकाळी चार वाजल्यापासून दिवसाची सुरुवात व्हायची ते घरची कामे आवरून आणि प्रयोगशाळेची कामे आवरत रात्री कधी बारा वाजायचे, तर कधी एक वाजायचा. त्यावेळी एक सून आणि शास्त्रज्ञ म्हणून घरातली जबाबदारी सांभाळणे यामध्ये माझ्या डॉक्टर पतीने मला खूप साथ दिली. नेहमी मला प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच मीही या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू शकले.

महिलांना संदेश

  • कोणतीही गोष्ट करताना ठामपणे, झोकून देऊनच केली पाहिजे. मला हे करायचं आहे अशी मनाशी जिद्द ठरवली की प्रत्येक गोष्ट शक्य आहे.

  • आपण कोणत्याही क्षेत्रात जरी असलो तरी ध्येय निश्चित करून त्यासाठी कायम काम करणे गरजेचे आहे. कारणे देत राहिलो तर आणखी दहा कारणे देत राहू. त्यामुळे ‘प्लॅन’ आणि ‘एक्झिक्युशन’ यावर माझा विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.