Raw Mango Benefits: आंबटचिंबट कैरी, लय भारी; उन्हाचा त्रास कमी अन्‌ प्रतिकारक्षमतेत वाढ

Raw Mango Benefits: वाढत्या उन्हात कैरीचे थंडगार पन्हे सर्वाधिक आरोग्यदायी मानले जाते.
Raw Mango Benefits:
Raw Mango Benefits: Sakal
Updated on

प्रकाश सनपूरकर

Raw Mango Benefits in summer

आंबटचिंबट कैरी म्हटले की तोंडाला पाणी सुटते. कैरी एक उत्तम ऋतुफळ असून जीवनसत्व सी युक्त कैरीला या ऋतुत तोडच नसते. अनेक प्रकारे आरोग्याचे लाभ देखील कैरीपासून मिळतात.

कैरीच्या फोडींना मीठ लावून खाणे, कैरीचे थंडगार पन्हे, कैरी चटणी, कैरी भात या सारख्या रेसिपीतून घरोघरी कैरीचा वापर सुरू होतो. गर्भावस्थेत कैरी खाण्याची इच्छा होणे हा प्रत्येक महिलेचा आनंददायी अनुभव असतो. साधारणपणे होळी झाली की बाजारात कैरी येण्यास सुरवात होते. घरोघरी कैरी खाण्यास सुरवात होत. वाढत्या उन्हात कैरीचे थंडगार पन्हे सर्वाधिक आरोग्यदायी मानले जाते.

  • कैरी खाण्याचे फायदे

प्रतिकारक्षमता वर्धक

कैरीमध्ये क जिवनसत्व (व्हीटॅमीन सी) असते. त्यामुळे व्यक्तीची प्रतिकारक्षमता वाढते. प्रतिकारक्षमता वाढीसाठी

कैरी खायलाच हवी.

कर्करोग प्रतिबंधक

कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते. हा घटक कर्करोग विरोधी आहे. या घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

हृदयविकार

कैरीमध्ये बी जीवनसत्व (व्हिटॅमिन बी) आणि तंतूमय पदार्थ (फायबर)असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो.

पचनासाठी फायदेशीर

कैरी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते. अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या की होतात. गर्भवतींना सकाळी अशक्तपणा वाटणे किंवा मळमळ होत असेल तर कैरी खावी.

Raw Mango Benefits:
Summer Skin Care: घाम, उन्हाच्या चटक्याचा त्वचेवर परिणाम, अशी घ्या खास काळजी

नेत्रांसाठी लाभ

कैरीमध्ये आढळणारे झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे डोळ्यांचे मॅक्युलर डिजनरेशनपासून संरक्षण करते.

दातांसाठी लाभ

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा स्कर्वी रोग कैरीच्या सेवनाने बरा होतो. कैरी खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात. तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या दूर होते.

उष्माघातासाठी लाभदायक

कैरी खाल्ल्यामुळे उष्माघात होत नाही. उष्माघाताचा त्रास असेल तर कैरीचे पन्ह पिणं खूप फायदेशीर आहे.

केसांसाठी लाभ

कैरी खाण्यामुळे केस जाड आणि चमकदार होतात.

कैरीची पोषक मूल्ये

ऊर्जा - ६० किलो कॅलरी

प्रथिने -०.५ ग्रॅम

चरबी - ०.३ ग्रॅम

कर्बोदके - १७ ग्रॅम

व्हिटॅमिन सी - २७.७ मिग्रॅ

व्हिटॅमिन ए - ०.२ मिग्रॅ

फोलेट - १४ एमसीजी

व्हिटॅमिन बी - ६० मिग्र

व्हिटॅमिन के - ४.२ एमसीजी

"उन्हामुळे भूक मंदावणे, तहान जास्त लागणारे यावर कैरीचे पन्हे अत्यंत गुणकारी आहे. आम्लरस हा वातशमन करणारा आहे. उन्हाचा कडाक्याने पचनक्रिया मंदावते. अशा वेळी कैरीचा पन्ह घेतले तर ते खूप उपयुक्त ठरते. भूकवाढीसाठी देखील कैरीची मदत होते. एकूणच हे उत्तम असे ऋतूफळ मानले पाहिजे जे की उन्हाळ्यात आरोग्याला लाभ देणारे ठरते."

- डॉ. शिल्पा येरमे, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.