अतिरिक्त प्रमाणात पाणी पिणे शरीरासाठी धोकादायक
डोकेदुखी आणि स्नायू कमकुवत झाल्याच्या तक्रारी
पाणी प्यायल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत आपण नेहमी ऐकतो. पाण्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहतेच पण, त्यासोबत आपल्या आरोग्यासाठी कित्येक गुणगारी तत्व देखील मिळतात. पण सोशल मिडियावर एका व्हायरल व्हिडिओनुसार, पाण्याचे अतिप्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
आजकाल काही हेल्थ एक्सपर्ट लोकांना 3 लीटर पेक्षा जास्त पाणी पिण्याचा सल्ला देत आहे. पण, एका व्हायरल व्हिडिओनुसार,पाण्यामुळे ओव्हर हायड्रेशन झाल्यास आरोग्यास धोकादायक ठरू शकते. हा दावा न्यूट्रिशनिस्ट रेनू रखेजा यांनी consciouslivingtips या आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 90 लाखांपेक्षा जास्ता लोकांनी पाहिला आहे.
रखेजा यांनी या व्हिडिओ कॅप्शनमध्ये, ''ओवर हायड्रेशनमुळे शरीरमधील इलेक्ट्रोलाईटची पातळी घटू शकते. ही पातळी कमी झाल्यानंतर डोकेदुखी आणि स्नायू कमकुवत झाल्याचा त्रास जाणवू शकतो.''
इलेक्ट्रोलाईटमध्ये पॉटेशियम, सोडियम आणि मॅग्नेशिअम असते. म्हणजे इलेक्ट्रोलाईटची ''पातळी कमी झाल्यामुळे असा पोषक मुल्यांची कमी होते. या सर्व गोष्टी किडनी आणि हार्ट योग्य रित्या कार्य करण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. इेल्क्ट्रोलाईटची पातळी घटल्यामुळे किडनी आणि हार्टवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.''
एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, ''रोज अतिरिक्त पाणी पिण्यामुळे तुमच्या पेशी ओव्हर सॅच्युरेटेड होतात कारण त्या पाण्यातील खनिज गुणोत्तर पुन्हा संतुलित करण्याचा प्रयत्न करतात.''
रखेजा यांनी या ओवर व्हिडिओमध्ये ओवर हाईड्रेशनमुळे आणखीही काही नुकसान होत असल्याचे सांगितले. ओव्हर हायड्रेशन ब्रेन फॉग, वजन वाढणे, डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. रखेजा पाणी पिण्याबाबत काही टिप्स आपल्या फॉलोअर्स सोबत शेअर केला आहे.
त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, ''कोणत्याही व्यक्तीने जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायले पाहिजे इतरवेळी टरबूज, पालक किंवा इतर भाज्यांमार्फत आपल्या शरीराला हायड्रेट ठेवू शकते. गरजेनुसार नारळपाणी, चहा, कॉफी, ज्यूस या सर्व गोष्टी देखील शरीराला हायड्रेट करू शकतात.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.