Driving Tips : नजर हटी, दुर्घटना घटी! वाहन चालवताना या चुका कराल तर महागात पडेल

safety driving tips: रात्रीच्या अंधारात डोळ्यांवर झापड येत असेल तर काय करावे?
Tips For Safe Driving
Tips For Safe Drivingesakal
Updated on

Tips For Safe Driving : कुटुंबासोबत प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आपण प्रत्येकजण काळजी घेत असतो. त्यासाठी सेफ्टी फिचर्स असलेली गाडी घेतो. ज्यामुळे अपघाताप्रसंगी आपल्याला जास्त नुकनास होणार नाही. गाडी चालवताना विशेष काळजी घेतील तरी अपघात होण्यासाठी एक छोटीशी चूकही कारणीभूत ठरू शकते.

तुम्हालाही तुमच्या कुटुंबाची, स्वत:ची काळजी असेल. तर गाडी चालवताना काही खास गोष्टींची काळजी घ्या. गाडी तुम्ही चालवत असला तुम्हाला अगदी परफेक्ट गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी देखील समोरचा गाडीवाला तुम्हाला येऊन धडकणार नाही ही गॅरंटी कोण देईल.

भारतातील रस्त्यांची स्थिती, ट्राफिक आणि गाडी चालवणाऱ्या लोकांची गती यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढलं आहे.  तुम्ही नवीन कार चालवायला शिकत असाल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. अन्यथा तुम्हाला नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काय काळजी घ्यावी हे पाहुयात.(Driving Tips : Accident happens if you lose your sight, Do not make these mistakes while driving)

Tips For Safe Driving
Driving Tips : रात्रीच्या वेळी गाडीला अपघात होण्याचा जास्त धोका? या 5 Technique येतील कामी

सीट बेल्ट घाला

अपघात झाल्यास सीट बेल्ट खूप उपयुक्त आहे, तो तुमचा जीव वाचवू शकतो. कारण अपघात झाल्यास गंभीर दुखापत होण्यापासून वाचवता येते. कार चालवताना सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर कारमध्ये बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावला पाहिजे.

सुरक्षित अंतर

जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा जवळच्या वाहनापासून योग्य अंतर ठेवा. असे केल्याने, समोरील वाहन अचानक थांबल्यास किंवा वळण लागल्यास होणारा अपघात टाळता येईल. हे तुम्हाला तुमची कार थांबवण्यासाठी किंवा इतर प्रतिक्रिया देण्यासाठी अधिक वेळ देईल.

विचलित होणे टाळा

वाहन चालवताना कधीही विचलित होऊ नका. लक्ष विचलित होणे टाळा कारण लक्ष विचलित झाल्यामुळे अनेक अपघात होतात. फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नका. रस्त्यावर वाहन चालविण्यावर आपले लक्ष केंद्रित करा.

Tips For Safe Driving
Driving Tips : जगातले 99% लोक कारचा दरवाजा चुकीच्या पद्धतीने उघडतात? पटत नसेल तर हे वाचाच!

नियम पाळा

कार चालवताना नेहमी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाची सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. वेग मर्यादा, ट्रॅफिक सिग्नल आणि रस्त्याच्या इतर सर्व नियमांचे पालन करा.

लाईन क्रॉस करू नका

वाहन चालवताना नेहमी लक्षात ठेवा की वाहन चालवताना कधीही आपल्या लेनच्या बाहेर जाऊ नका. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

गाडीची सर्व्हिसिंग करावी

लांबच्या प्रवासाआधी गाडी एकदा चेक करून घ्यावी. पण के प्रोफेशनल मेकॅनिककडूनच करावे. अनेकदा गाडीची अधिकृत कंपनीच्या सेंटरमधून सर्विसिंग न करता अनेकजण लोकल मॅकेनिककडून गाडीची सर्विसिंग करून घेतात. लोकल किंवा शिकाऊ मॅकेनिककडून एखादी चूक होण्याची शक्यता असते. (Driving Tips)

Tips For Safe Driving
Driving Tips : चांगलं मायलेज हवंय? मग या गियरमध्ये चालवा कार? Perfect Driving साठी महत्वाच्या टिप्स

आजकाल अनेक अपघात रात्रीच्यावेळी होतात. रात्रीच्या अंधारात डोळ्यांवर झापड येत असेल तर काय करावे?

जर आपल्याला गाडी चालवताना झोप येत असेल तर सुरक्षीत ठिकाणी जसं पेट्रोल पंप किंवा धाबा अशा साधारण वर्दळ असलेल्या ठिकाणी इतर गाड्यांना अडथळा होणार नाही अशी काळजी घेऊन गाडी थांबवावी व थोडा आराम करून परत प्रवासाला सुरवात करावी.

गाडी थांबवण शक्य नसेल तर सहप्रवाशांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊन मंद आवाजात आपल्या आवडीची किंवा कोणतीही गाणी लावावीत ज्यांने आपली झोप उडेल.

रात्रीच्या प्रवासात झोप येत असेल तर एखाद चहाच ठिकाण पाहून डोळ्यावर पाण्याचा भपकारा मारावा व एक गरमागरम चहा प्यावा ज्याने झोप उडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()