Drunk and Drive कराल तर होईल २ वर्षांची जेल, जाणून घ्या काय आहे नियम

भारतासह इतर अनेक देशांमध्ये दारू पिऊन वाहन चालवण्यास बंदी असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं कायदेशीर गुन्हा आहे. भारतातही ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात व्यक्तीवर कारवाई करण्यात येते
नियम ड्रंक अँड ड्राईव्ह बाबतचे
नियम ड्रंक अँड ड्राईव्ह बाबतचेEsakal
Updated on

दारु किंवा अल्कोहल हे आरोग्यासाठी हानिकारक आहेच शिवाय दारूच्या सेवनाने इतरही अनेक मोठ्या अडचणी निर्माण होवू शकतात. खास करून दारूचं सेवन करून वाहन चालवणं Driving अत्यंत धोकादायक ठरू शकतं. Driving Tips Marathi Know consequences of Drunk and Drive

वाहन चालवण्यासाठी मन एकाग्र ठेवणं आणि शरीरावर नियंत्रण असणं गरजेचं असतं. मात्र दारूमुळे व्यक्तीचं शरीरावरील नियंत्रण कमी होतं. यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. दारूचं सेवन करून वाहन चालवणं Drunk and Drive हे केवळ तुमच्याच नव्हे तर इतरांच्यादेखील जीवावर बेतू शकतं.

यासाठीच भारतासह इतर अनेक देशांमध्ये दारू पिऊन वाहन चालवण्यास बंदी असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं Driving कायदेशीर गुन्हा आहे. भारतातही ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात व्यक्तीवर कारवाई करण्यात येते. यामध्ये वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला जेलदेखील होवू शकते.

आजही भारतामध्ये काही अपघातांसाठी मद्यधुंद अवस्थेत ड्रायव्हिंग करणं हे एक कारण आहे. दारूचं सेवन करून वाहन चालवण्यास प्रतिबंध आणण्यासाठी कठोर नियम Laws आखण्यात आले आहेत. मात्र अनेकांना हे नियमच ठाऊक नसतात किंवा काहीजण या नियमांकडे दुर्लक्ष करतात.

ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचे नियम

पहिल्यांदा दारूचं सेवन करून वाहन चालवताना आढळल्यास १० हजार रुपयांपर्यत दंड आणि ६ महिन्याच्या कारावासाची तरदूत आखण्यात आली आहे. तर दुसऱ्यांदा दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेमध्ये वाढ होवू शकते.

दुसऱ्यांदा ड्रंक अॅण्ड ड्रायइव्ह करताना आढळल्यास १५,००० रुपयांचा दंड होऊ शकतो तसंच २ वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी जेल होवू शकते. अशा प्रसंगी केवळ दंड भरून वाहन चालकाची सुटका होत नाही. तर वाहन चालकावर कायदेशीर गुन्हा देखल दाखल होतो.

हे देखिल वाचा-

नियम ड्रंक अँड ड्राईव्ह बाबतचे
Driving License Types: भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरून परदेशात गाडी चालवता येते का?

नियमांचं पालन करणं गरजेचं

वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्यासह इतर वाहन चालक शिवाय पायी चालणाऱ्यांची तसचं आसपासच्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ते फायद्याचं ठरतं. नियम मोडणं काही वेळेस धोकादायक ठरू शकतं आणि एखाद्याला जीव गमवावा लागू शकतो. यासाठी वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

वाहतुकीचे इतर महत्वाचे नियम

दारूचं सेवन करून वाहन न चालवणं या नियमांसोबत इतरही काही महत्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे.

कारमध्ये प्रवास करताना कायम सीटबेल्टचा वापर करणं

बाईक किंवा स्कूटरवर प्रवास करत असताना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी कायम हेल्मेटचा वापर करणं.

दारू किंवा ड्रग्सच्या नशेत वाहन न चालवणं.

कोणतही वाहन चालवत असताना स्पीड कंट्रोलमध्ये ते चालवणं.

रस्त्यावरील सिग्नल तसचं गतीरोधक आणि इतर नियमांचं पालन करणं.

अशा प्रकारे कोणतही वाहन चालवताना वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करणं सुरक्षेच्या दृष्टीने कायम योग्य ठरतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.