Dry Fruit Face Pack : आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही उत्तम आहेत 'ड्रायफ्रुट्स', वाचा कसं बनवणार ड्रायफ्रुट्सचा फेस पॅक

असे 3 ड्राय फ्रूट आहेत जे स्किन केअरसाठी वापरले जाऊ शकतात. हे त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या आणि पिंपल्स दूर होतात.
Dry Fruit Face Pack
Dry Fruit Face Packsakal
Updated on

ड्राय फ्रुट्स आरोग्यासाठी खूप चांगले असतात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्य चांगले ठेवतात. ड्रायफ्रुट्स खाणे देखील त्वचेसाठी चांगले असते. मात्र, ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करण्यासोबतच ते चेहऱ्यावर लावणे देखील फायदेशीर ठरते. असे 3 ड्राय फ्रूट आहेत जे स्किन केअरसाठी वापरले जाऊ शकतात. हे त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या आणि पिंपल्स दूर होतात. हे चेहऱ्यावर कसे लावायचे ते जाणून घेऊया.

मनुक्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा

मनुका त्वचेवर चमक आणण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्वचा तरुण ठेवण्यासाठी तुम्ही मनुक्याचा फेस पॅक बनवू शकता. हे करण्यासाठी 8-10 मनुके चांगले मॅश करा. मॅश केलेल्या मनुकामध्ये दूध घालून पेस्ट बनवा. हा मनुक्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा.

Dry Fruit Face Pack
Skin Care Tips : चेहऱ्यावर किवी लावताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कारण...

बदामाच्या फेस पॅकने त्वचेला मसाज करा

बदाम त्वचेसाठी खूप चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे चेहऱ्याला चमक येते. स्किन केअरसाठी तुम्ही बदामाचा फेस पॅक वापरू शकता. बदामाचा फेस पॅक बनवण्यासाठी 4-5 बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी केळी आणि बदामाची पेस्ट बनवून चेहऱ्याला मसाज करा. थोडा वेळ मसाज केल्यानंतर साधारण 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा.

डेड स्किन सेल्सपासून मिळेल सुटका

त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही अक्रोडाच्या सालीची पावडर वापरू शकता. अक्रोडाच्या सालीने तुम्ही घरच्या घरी फेस पॅक बनवू शकता. यामुळे त्वचा तरुण आणि सुंदर दिसते.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर अक्रोडाची साल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अक्रोडाच्या सालीपासून बनवलेली पावडर तुमची तेलकट त्वचा स्वच्छ करते.

Related Stories

No stories found.