Face Packs for Dry Skin : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात?गुलाबजल आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

पावसाळ्यात आणि थंडीमध्ये कोरड्या त्वचेची खास काळजी घ्यावी लागते.
Face Packs for Dry Skin
Face Packs for Dry Skinesakal
Updated on

त्वचा फ्रेश आणि टवटवीत असेल तर आपले व्यक्तिमत्व आणखी खुलून दिसते. त्वचा हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. प्रत्येकाची त्वचा ही भिन्न असते. तेलकट, कोरडी, नॉर्मल, मिश्र त्वचा आणि संवेदनशील त्वचा असे त्वचेचे प्रकार आहेत.

प्रत्येक त्वचेच्या समस्या आणि त्यावरील उपाय वेगवेगळे आहेत. त्वचेच्या प्रकारानुसार कोणते स्किन प्रॉडक्टस् सूट होतात ? हे पाहणं देखील तितकचं महत्वाचे आहे. या सगळ्यात कोरडी त्वचा असणाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत.

थंडीमध्ये आणि पावसाळ्यात कोरड्या त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर पुरळ येणे, त्वचा कोरडी किंवा रूक्ष होणे, त्वचेवर खाज येणे अशा समस्या कोरडी त्वचा असणाऱ्यांना सतावत असतात. आज आपण या कोरड्या त्वचेसाठी घरगुती पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या होममेड फेसॅपक्स बद्दल जाणून घेणार आहोत.

कोरफड आणि काकडी

कोरफड आणि काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. कोरडी त्वचा हायड्रेटेड राहणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी कोरफड आणि काकडी त्वचेवर जादुई पद्धतीने काम करतात. काकडी आणि कोरफड त्वचेला मॉईश्चराईझ करण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतात.

कोरफड आणि काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी एक काकडी किसून घ्या. त्यामध्ये, एक चमचा कोरफड जेल मिक्स करा, आता तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५-२० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका.

Face Packs for Dry Skin
Tomato for Skin : मऊ आणि चमकदार त्वचा हवी आहे ? मग, टोमॅटोपासून बनवा ‘हे’ होममेड स्क्रब्स

हळद आणि दही

हळद आणि दही हे दोन्ही घटक आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. कोरड्या त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हळद आणि दही हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत.

हा फेस पॅक बनवण्यासाठी दोन चमचे दही घ्या, त्यामध्ये १ चमचा हळद आणि १ चमचा मध मिक्स करा. हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. हळदीमुळे चेहऱ्यावर उजळपणा येतो आणि दह्यामुळे चेहरा मऊ होण्यास मदत होते.

गुलाबजल आणि मध

गुलाबजल त्वचा स्वच्छ करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. गुलाबजलमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. तसेच, मधामुळे त्वचा मऊ राहते आणि त्वचेला चांगले पोषण मिळते.

हा फेसपॅक तयार करण्यासाठी १ चमचा गुलाबजल घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा, त्यानंतर चेहरा धुवून टाका.

Face Packs for Dry Skin
Scrubs For Oily Skin : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग तांदूळ आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.