Eye Care Tips: तासंतास लॅपटॉप अन् मोबाईलतच्या वापराने डोळे दुखताय? या घरघुती उपायांनी चटकन मिळेल आराम

सतत लॅपटॉप किंवा मोबाईलपुढे राहिल्याने तुमचे डोळे दुखायला लागणे साहाजिक आहे
Eye Care Tips
Eye Care Tipsesakal
Updated on

Home Remedies: अलीकडे सगळीकडे आपल्याला ऑनलाइन काम होताना आपल्याला दिसते. प्रत्येक कार्यालयात लॅपटॉप किंवा कंप्युटरशिवाय कामच होत नाही. तेव्हा सतत लॅपटॉप किंवा मोबाईलपुढे राहिल्याने तुमचे डोळे दुखायला लागणे साहाजिक आहे. डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये जळजळणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांमधून पाणी गळणे यांसारख्या समस्यां जाणवतात. तेव्हा यावर आज आपण घरघुती उपाय जाणून घेणार आहोत.

डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवल्यास हे उपाय करा

डोळ्यांच्या दुखण्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी बर्फाला एका कोरड्या कपड्यात गुंडाळून बंद डोळ्यांवर थोड्या वेळ बर्फ ठेवा. साधारण बर्फ १० मिनीटे डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने डोळ्यांना जाणवणारा थकवा आणि सूजन यांसारख्या समस्या दूर होतात.

काकडी

काकडीचे काप डोळ्यांवर ठेवणे हा डोळ्यांचा थकवा दूर करण्याचा बेस्ट उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी काकडी घ्या आणि त्याचे गोल काप करा आणि २० मिनीटांपर्यंत त्याला डोळ्याखाली ठेवा. तुमच्या डोळ्यांचा थकवा झटक्यात दूर होईल.

डोळ्यांचा व्यायाम करा

डोळ्यांचा व्यायाम करण्याचेही अनेक फायदे आहेत. त्याने डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच तुम्हाला एकाकी लक्ष केंद्रित करणेही सोपे जाते. हा व्यायाम करण्यासाठी एक हात तुमच्या डोळ्याजवळ आणा आणि नंतर दूर न्या त्याने तुमच्या डोळ्यांचा थकवा दूर होईल. असे तुम्हाला १०-१५ वेळा करायचे आहे. असे केल्यास तुम्हाला डोळ्यांच्या दुखण्यापासूनही आराम मिळेल. (Back Pain)

Eye Care Tips
Eyes Air Pollution Effect : प्रदूषणामुळे डोळ्यांना जळजळ होते? या 5 टीप्स ठरतील लाभदायक

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.