Dussehra 2023 : रावण दहनाची राख आणून करा हा उपाय, घरातली तिजोरी होईल धन-धना-धन

दसऱ्याला केलेले हे उपाय घरातील अनेक अडचणी नष्ट करतील
Dussehra 2023
Dussehra 2023 esakal
Updated on

Dussehra 2023 : दसरा या सणाला आपल्याकडे वेगळेच महत्त्व आहे. दसऱ्यादिवशी दु:ख संपून सुखाची सुरूवात होते असे म्हटले जाते. त्यामुळेच दसऱ्यादिवशी अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचा जागर करून दहाव्यादिवशी रावणाचा वध केला जातो.

प्रभू श्रीरामांनी रावण वध केला तो विजयादशमी दिवशीच. तसेच रावणाला वाईट प्रवृत्ती मानले जाते. त्यामुळे मनुष्याच्या आत असलेल्या सर्व वाईट गोष्टी जाळून टाकाव्यात असा त्यामागील उद्देश आहे.

Dussehra 2023
Dussehra 2023 Wishes: दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा, सर्वांनाच आवडतील तुम्ही दिलेल्या या शुभेच्छा

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी लंकापती रावणाचा वध झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी विजयादशमीला रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार दसर्‍याच्या दिवशी काही वास्तु उपाय केले जातात, जे केल्याने घरातील पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि मोठा फायदाही होतो. चला तर मग जाणून घेऊया दसऱ्याला वास्तु उपायांबद्दल.

दसऱ्याला करा हे वास्तु उपाय करा

वास्तुशास्त्रानुसार दसऱ्याच्या तिथीला ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी घटातील धान्याच्या काड्या ठेवणे खूप शुभ मानले जाते. नवरात्रीच्या काळात घटस्थापनेत उगवलेले धान्याच्या काही काड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्याने पैशाची समस्या दूर होईल. (Dussehra 2023)

Dussehra 2023
Dussehra 2023 : सोनं घ्या सोन्यासारखं रहा! दसऱ्याला आपट्याची पाने का वाटली जातात?

रावण दहनाची राख

वास्तुशास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची राख किंवा लाकूड आणणे खूप शुभ मानले जाते. जेव्हा रावणाचा पुतळा दहन केला जातो. तेव्हा लाकूड किंवा राखचा एक छोटा तुकडा लाल कपड्यात बांधला जातो. आणि घरी आणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगला जातो.

असे मानले जाते की असे उपाय करणार्‍या व्यक्तीच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते. धार्मिक मान्यतेनुसार ही राख रावणाची हाडे असल्याचेही सांगितले जाते.

Dussehra 2023
Dussehra 2023 : रावणामध्येही होत्या चांगल्या गोष्टी ज्या प्रत्येक व्यक्तीने शिकल्याच पाहिजे

झाडू दान करावे

ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी झाडू दान करावे. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी झाडू दान करतो त्याला कर्जापासून मुक्ती मिळते आणि घरात कधीही पैशाची समस्या येत नाही.

दसऱ्याच्या दिवशी विद्यार्थ्यांनी घरी भगला ध्वज बनवावा किंवा तो बाजारातून विकत घ्यावा आणि हनुमान मंदिरात जाऊन तो स्वत: लावावा. असे केल्याने अभ्यासाच्या क्षेत्रातील अडथळे दूर होतील आणि तुम्ही तुमच्या करिअरचा झेंडा रोवू शकाल.

Dussehra 2023
Dussehra Vijayadashami festival : प्रदूषणमुक्तीचा शुभमुहूर्त दसऱ्याला जिल्ह्यातून इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी

चंद्राकडे बघत नामस्मरण करणे

जर तुम्ही मानसिकदृष्ट्या दु:खी असाल, नैराश्याची प्रवृत्ती वारंवार वर्चस्व गाजवत असाल आणि जीवनाबद्दल निराशेची भावना असेल किंवा अज्ञाताची कसलीही भीती वाटत असेल, तर दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत रोज रात्री चंद्राकडे पहा आणि त्याचा प्रकाश घ्या. नामस्मरण करत बसा. रोज पाच-दहा मिनिटे या प्रकाशात बसा आणि चंद्राशी तुमचे मन सांगा, तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.