Dussehra 2023 : दसऱ्याला पाहुणे घरी येताच करतील कौतुक, असे सजवा तुमचे संपूर्ण घर

तुमचे घर सजवण्यासाठी या काही आयडियाज तुम्हाला कामी येतील.
Dussehra 2023
Dussehra 2023esakal
Updated on

Dussehra 2023 : भारत हा देश संस्कृतीचा अमोल ठेवा जपणारा देश. वर्षभरात येणारे सगळे सण भारतात धुमधडाक्यात साजरे केले जातात. हे सण घरात आनंद, उत्साह निर्माण करतात. तेव्हा या निमित्ताने तुमच्या घराला सुंदर सजवा. तुमचे घर सजवण्यासाठी या काही आयडियाज तुम्हाला कामी येतील.

रांगोळी

रांगोळी हा सजावटीचा भाग आहे. त्याने घरात प्रसन्नता येते. तेव्हा दसऱ्याला घरात तुम्हाला जमेल त्या पद्धतीने रांगोळी काढा. गूगलवरसुद्धा बऱ्याच डिझाइन्स उपलब्ध असतात. तिथून बघूनसुद्धा तुम्ही घरात सुंदर रांगोळी काढू शकता.

Dussehra 2023
Dussehra 2023

दिव्यांची सजावट

दिव्यांचा प्रकाश घरात रोशणाई पसरवतो. दिवा फक्त प्रकाशच पसरवत नाही तर अंधारावर उजेडाच्या विजयाचे प्रतिक दर्शवते. तुमच्या घरातील वातावरणात सकारत्मकतेची भर दिवे निर्माण करतात. तुम्ही खिडकीच्या चौकटीवर किंवा रांगोळी मध्ये आणि टेबलावर दिव्यांची आकर्षक मांडणी करू शकता.

Dussehra 2023
Dussehra 2023

कलरफुल पडदे

तुमच्या घराला आणखी सुंदर लुक देण्यासाठी तुम्ही घरात रंगीत पडदे लावू शकता. त्यामुळे घराला युनिक लुक येईल.

Dussehra 2023
Dussehra 2023

फुलांची सजावट

तुम्ही घराला फुलांनी सजवू शकता. सणांच्या दिवसांत फुलांनी घराला वेगळी शोभा येते. तुमच्या घरातील टेबलवर किंवा घराच्या दारात फुलांच्या माळा सजवा. याने घरात प्रसन्न वातावरण राहते. शिवाय घरात येणाऱ्याससुद्धा तितकेच प्रसन्न वाटते.

Dussehra 2023
Dussehra 2023

दसऱ्याच्या सजावटीसाठी तुम्ही वॉल आर्टचासुद्धा वापर करू शकता. मार्केटमध्ये घराच्या भितींला अडकवण्यासाठी वेगावेगळ्या प्रकारचे हँगिंग मिळतात. तुम्ही ते सुद्धा लावून घर सजवू शकता.

तुमच्या घरातील प्रमुख ठिकाणी राम, सीता, हनुमान आणि रामायणाशी संबंधित इतर देवतांच्या मूर्ती ठेवू शकता. फुलांच्या माळा, धूप अगरबत्ती आणि दिव्यांनी तुम्ही मंदिर परिसर सजवू शकता. संस्कृती जपत केलेली ही सजावट निश्चितच तुमच्या घराला अप्रतिम लुक देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.