Dussehra 2024: यंदा 12 की 13 ऑक्टोबर कधी साजरा केला जाणार दसरा? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् वेळ

Dussehra Date And Time 2024: हिंदू पंचागानुसार आश्विन महिन्याच्या शल्क प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते.
Dussehra Date And Time 2024:
Dussehra Date And Time 2024:Sakal
Updated on

Dussehra Date And Time 2024: हिंदू पंचागानुसार आश्विन महिन्याच्या शुल्क प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते.

मान्यतेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामांंनी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. तसेच तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानुसार वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतिक असलेला दसरा हा सण देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी शस्त्रांची पूजा करून मोठ्यांना आपट्याची पाने देऊ आशिर्वाद घेतला जातो. तसेच या दिवशी मोकळ्या मैदानावर रावण दहनाचे आयोजन केले जाते. यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी साजरी करण्यात येत आहे. तर दसरा कधी आहे याबाब अनेकांमध्ये गोंधळ आहे. यंदा दसरा कधी साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहुर्त काय आहे हे जाणून घेऊया.

शुभ मुहुर्त कोणता?

यंदा दसरा 12 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचागानुसार आश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी दशमी सुरू होईल तर 13 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी समाप्त होईल. 12 ऑक्टोबरला शुभ मुहुर्त दुपारी 2 वाजून 3 मिनिट ते 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत आहे. तर पूजेचा शुभ मुहुर्त दुपारी 1 वाजून 17 मिनिटे ते 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत आहे.

Dussehra Date And Time 2024:
Dussehra Rangoli 2024: दसऱ्याला काढा 'या' सुंदर रांगोळ्या, अंगणाची वाढेल शोभा तसेच सर्वजण करतील कौतुक
Dussehra Date And Time 2024:
Dussehra Decoration Idea: डेकोरेशनचं टेंशन आलय? दसऱ्याला 'या' सोप्या पद्धतीने सजवा घर, सर्वजण करतील कौतुक

दसऱ्याला शस्त्रपुजनाला का केले जाते?

दसऱ्याला शुभ कोणतेही चांगले काम करणे शुभ मानले जाते. पूर्वी क्षत्रिय युद्धावर जाण्यापुर्वी दसऱ्याची वाट पाहत असे. या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता. तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी युद्धाला सुरूवात केल्यास विजय निश्चित असतो, असे मानले जाते. तसेच या काळात युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जात असे. म्हणून दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.