Dussehra 2024 : जग करतं देवीची पूजा अन् इथं होते दहा दिवस रावणाची पूजा, पण का?

Ravan puja : रावणाचे कृत्य पाहता अनेक लोक त्याचा द्वेष करतात. पण, भारतातल्या मध्यप्रदेशात असे एक गाव आहे जिथले लोक रावणाची पूजा करतात
Dussehra 2024
Dussehra 2024esakal
Updated on

Dussehra 2024 :

आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गा मंडळांमध्ये विराजमान झाली होती. लोक देवीच्या भक्तीत तल्लीन होते. दुर्गामातेची विविध रूपात पूजा केली जात होती. पण, आपल्या देशात असे गाव आहे जिथे रावणाची पूजा केली जाते.

सीता मातेला पळवून नेणाऱ्या रावणाचा विजयादशमी दिवशी प्रभू श्रीरामांनी वध केला होता. त्यामुळे विजयादशमी साजरी केली जाते. पण, या रावणाचे कृत्य पाहता अनेक लोक त्याचा द्वेष करतात. पण, भारतातल्या मध्यप्रदेशात असे एक गाव आहे जिथले लोक रावणाची पूजा करतात.

इतकेच नाहीतर ते गणेशोत्सवाप्रमाणे १० दिवस रावणाची प्रतिष्ठापणा करतात. हे गाव कोणतं अन् इथल्या गावकऱ्यांना रावणाची पूजा का करावीशी वाटते याबद्दल अधिक जाणून गेऊयात.

हे गाव मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील जमुनिया हे आहे.या गावात आदिवासी समाजातील काही लोकांनी नवरात्रीच्या काळात रावणाचा पुतळाही बसवला आहे. असा पुतळा जिल्ह्यातील आणखी काही गावात पाहायला मिळत आहे.

रावणाची मूर्ती
रावणाची मूर्ती esakal
Dussehra 2024
Navratri 2024: कन्यापूजनदिवशी मुलींना द्या याच भेटवस्तू, देवी होईल प्रसन्न

१० दिवस होते पूजा (Ravan Puja) 

ज्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ सार्वजनिक मंडळांमध्ये माता दुर्गेची आरती केली जाते, त्याचप्रमाणे रावणाचीही पूजा केली जाते. फरक एवढाच की रावणाची आरती करण्याऐवजी तिथे त्याचे स्मरण केले जाते. आदिवासी समाजातील लोकांनी बसवलेल्या रावणाची मूर्ती भगवान शंकराची पूजा करताना दाखवली आहे.

Dussehra 2024
Navratri Fast Recipe: नवरात्रीत नवव्या दिवशी सकाळी नाश्त्यात झटपट बनवा राजगिरा आणि साबुदाणा डोसा, लगेच नोट करा रेसिपी

माता दुर्गेच्या स्थापनेसोबत ज्याप्रमाणे कलशांची प्रतिष्ठापना केली जाते, त्याचप्रमाणे यावेळी आदिवासी समाजातील लोकांनी पंडालमध्ये पाच कलशांची प्रतिष्ठापना केली आहे. रावणाच्या मूर्तीच्या बरोबर समोर हे कलश ठेवण्यात आले आहेत.

आदिवासी समाजातील लोकांनीही 9 दिवस प्रतिष्ठापना केल्यानंतर दसऱ्याला मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dussehra 2024
Navratri 2024 : नवरात्रोत्सवात दगडी दिव्यांची झाली विक्रमी विक्री; भाविकांसह मंडळांकडूनही खरेदी

का करतात रावणाची पूजा ? (Ravan Puja In Pandal)

रावणाची आई ही आदिवासींची वंशज आहे, म्हणूनच तिची पूजा केली जाते.पांडा सुमित कुमार सल्लम म्हणाले, "आम्ही स्थापित केलेला पुतळा रामायणातील रावणाचा नसून, आमच्या पूर्वजांनी पुजलेल्या रावणाचा आहे.

इथले गावकरी म्हणतात की, आमचे पूर्वज अनेक वर्षांपासून रावणाची पूजा करत आहेत. आम्हाला कोणत्याही धर्माबद्दल द्वेष नाही. दुर्गामाता मंडळांमध्ये पूजा केली जाते, त्यानंतरच आम्ही रावणाच्या मंडळांमध्ये त्याचे स्मरण करतो. आपल्या आदिवासी समाजात भगवान शिवाची पूजा केली जाते. जिल्ह्यातील आदिवासी भागात रावण पूजनीय मानला जातो.

Dussehra 2024
Navratri 2024 : नववी माळ कामात यश देऊन भक्तांचं भलं करणारी माता सिद्धिदात्री

रावण दहनावर बंदी घालण्याची मागणी

जिल्ह्यातील रावणवाडा गावात रावणाचे मंदिर अनेक वर्षे जुने आहे. अनेक ठिकाणी लोक रावणाचा मुलगा मेघनादची पूजा करतात. अनेक वर्षांपासून हे लोक रावण दहनावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पुतळ्याचेही करावे. तसेच, रावण दहन करू नये, असे इथल्या लोकांना वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.