Ear Care Tips : कानांना सुरक्षित ठेवायचं असेल तर आत्ताच ही घाणेरडी सवय बदला!

इअरफोन कसे साफ करावेत?
Ear Care Tips
Ear Care Tipsesakal
Updated on

Ear Care Tips : बाईक,कार चालवणाऱ्यांच्या कानात हमखास हेडफोन असतात. तर रस्ताने चालणारे तरूण पोरंही कानाता हेडफोन घातलेले असतात. हेडफोन जसा वापरायला सोपा आणि आरामदायक आहे तसे त्याचे अनेक तोटेही आहेत.

आता हेच बघा ना, घाईत कुठंतरी बाहेर पडताना अचानक आपण हेडफोन घेतो अन् कानात घालतो तो साफही करत नाही. बर काहीवेळा स्वत:चा हेडफोन न घालता आपण दुसऱ्याचा वापरतो.

कधी एखाद्या ठिकाणी प्रवासात दुसऱ्याचा हेडफोन घेऊन गाणी ऐकण्याची सवय अनेकांना असते. पण तुम्हाला माहित आहे का तुमची ही छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते.

Ear Care Tips
Ringing Noises In Ear :  कानात सतत शिट्टी वाजल्याचा आवाज येतोय का? असू शकतो हा आजार  

फंगल इन्फेक्शन

अनेकदा आपण गरज असल्याने दुसऱ्याचे इयरफोन वापरतो, जे चुकीचे आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील जवळपास 7 टक्के लोक कानदुखीच्या समस्येशी झगडत आहेत. आणि बहुतेक लोक बुरशीच्या संसर्गाच्या समस्येने त्रस्त आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे इतरांचे आयफोन वापरणे.

बुरशीसह कीटकांची समस्या

अनेकदा आपण विचार न करता कोणाचे इअरफोन उचलतो आणि पटकन कानात घालतो, पण आपल्या या सवयीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. किंबहुना अनेकदा ज्यांच्या इअरफोनचा आपण वापर करत असतो, त्यांच्या कानात आधीच इन्फेक्शन होऊ शकतं.

अशावेळी इअरफोनमध्ये बुरशीसह किडे देखील असू शकतात जे आपल्या कानांपर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी तुमचे कान खराब होऊ शकतात आणि तुम्हीही असुरक्षित होऊ शकता.

Ear Care Tips
Headphone Offer: अशी संधी पुन्हा नाही! ५ हजारांचे ब्रँडेड हेडफोन अवघ्या १,७९९ रुपयात; पाहा डिटेल्स

सर्दी झालेल्या व्यक्तीचे इयरफोन

बऱ्याच वेळा आपण सर्दीला हलकेपणाने घेतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. जर एखाद्याला सर्दी झाली असेल तर आपण त्याचे इयरफोन वापरणे टाळावे. सर्दी असलेल्या व्यक्तीस कानात संसर्ग होण्याची शक्यता असते जी आपल्या कानांपर्यंत पोहोचू शकते.

याबाबत WHO काय म्हणतं?

इअरफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील सुमारे १० कोटी तरुणांच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होत असल्याचा दावा डब्ल्यूएचओने केला आहे. यासोबतच जर एखादी व्यक्ती दोन तास आणि 100 डेसिबलपेक्षा जास्त वेळ गाणी ऐकत असेल तर त्याला कानात त्रास होऊ शकतो आणि ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इयरफोनच्या अतिवापरामुळे हृदयाचे आजारही होऊ शकतात, तर त्याचा मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

Ear Care Tips
Wireless Headphones: वायरलेस इयरफोन बऱ्याच वेळ वापरलं आणि त्याला ऐकायला येणंच झालं बंद

इअरफोन कसे साफ करावेत

- तुम्ही मायक्रोफायबर कापड वापरून TWS इअरबड्स हलक्या हाताने साफ करू शकता

- इयरबड्सचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी कापूस आणि रबिंग अल्कोहोलचा वापर करा. कापूस थोडा दाबूव फिरवलात की इअरबड्स स्वच्छ होतील.

- आपण इयरफोन स्वच्छ करण्यासाठी ब्रश वापरू शकता. तेथील इयरवॅक्स आणि घाण बाहेर काढण्यासाठी ब्रश हळूवारपणे इयरपीसमध्ये फिरवा. यानंतर जरा ओल्या कापडाने इयरफोन पुसता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.