Earbuds Cleaning Tips : मळ आणि धुळीने माखलेले Earbuds कसे स्वच्छ करावेत?

कानात मळ अडकल्याने इअरबड लवकर खराब होतात
Earbuds Cleaning
Earbuds Cleaningesakal
Updated on

Earbuds Cleaning Tips : गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात अनेक मोठे बदल झाले आहेत. आता अनेक स्मार्टफोनमधून हेडफोन जॅक गायब झाला आहे, ज्यामुळे लोक इयरबड्स वापरू लागले आहेत. अलीकडच्या काळापर्यंत इयरबड्सची किंमत खूप जास्त असायची. पण आता तुम्हाला हजार रुपयांत चांगले इयरबड्स मिळणार आहेत.

कानात मळ आणि आजूबाजूची धूळ अडकल्याने इअरबड लवकर खराब होतात, त्यामुळे आवाजही नीट येत नाही. हे इअरबड्स साफ करणंही खूप अवघड आहे, कारण स्पीकर्सची जाळी तुटण्याची भीती आहे. पण काही टिप्स आहेत.

Earbuds Cleaning
Clean Teeth Tips : पिवळे दात झटक्यात होतील पांढरे शुभ्र, त्यासाठी करा हा उपाय

कापड

तुम्ही मायक्रोफायबर कापड वापरून TWS इअरबड्स हलक्या हाताने साफ करू शकता. तुम्ही ते एकावेळी एक इअरबड स्वच्छ केले पाहिजे. आणि नंतर त्याच प्रकारे चार्जिंग केस स्वच्छ करा. तुम्ही यासाठी कॉटनचे सुती कापडही वापरू शकता.

ब्रश

तुम्ही इयरबड्स साफ करण्यासाठी मऊ ब्रश वापरू शकता. यासह, आपण आपले इयरबड्स सुरक्षितपणे साफ करू शकता आणि घाण काढून टाकू शकता. ब्रशच्या दातांनी हे इयरबड्स सहज साफ होतात. त्यामुळे तो एक सोप्पा पर्याय आहे.
 

Earbuds Cleaning
Helmet Cleaning Tips : हेल्मेट अस्वच्छ ठेवणं ठरु शकतं धोक्याचं! आजच करा आतून साफ...

कापूस वापरा

इयरबड्सचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी कापसाचा वापर करा. त्यात रबिंग अल्कोहोलचा वापर करा. स्वच्छ करण्यासाठी कापसाला थोडा दाब लावावा लागेल आणि हळुवारपणे स्वच्छ करावा लागेल. यात तुम्हाला कान स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे इअरबडही मदत करतील.

इअरपीन

तसेच कानाचे छिद्र उघडण्यासाठी, आपण इयरपीससाठी ब्रश वापरू शकता. तेथील इयरवॅक्स आणि घाण बाहेर काढण्यासाठी ब्रश हळूवारपणे इयरपीसमध्ये वळवा. यानंतर जरा ओल्या कापडाने इयरपीस पुसता येतो.

Earbuds Cleaning
Tea Stainer Cleaning Tips : चहा गाळून चहा गाळणी काळीकुट्ट झालीय? हे 3 सोपे घरगुती उपाय करून पहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.