निरोगी राहण्यासाठी ट्राय करा हे Detox Drink, वाढतं वजन आणि त्वचेच्या समस्याही होतील दूर

शरीरातील विषारी किंवा घाण बाहेर पडल्यानंतर शरीराला अन्नातील सर्व पोषक तत्व मिळून त्याचे फायदे होतात. शरीर डिटॉक्स Detox करण्यासाठी तुम्ही आहारात वेळोवेळी काही डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करू शकता.
detox drinks health benefits
detox drinks health benefits
Updated on

Detox drinks benefits: निरोगी राहण्यासाठी जरी तुम्ही पोषक आहार Healthy Diet घेत असलात तरी त्यातील पोषक तत्वं संपूर्णपणे शरीराला मिळणं गरजेचं आहे. यासाठीच शरीरातील घाण स्वच्छ करणं म्हणजेच शरीर वेळोवेळी डिटॉक्स Body Detox करणं गरजेचं असतं. Easy Detox Drink recipes in Marathi Health Tips

शरीरातील विषारी किंवा घाण बाहेर पडल्यानंतर शरीराला अन्नातील सर्व पोषक तत्व मिळून त्याचे फायदे होतात. शरीर डिटॉक्स Detox करण्यासाठी तुम्ही आहारात वेळोवेळी काही डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करू शकता. घरच्या घरी अगदी सहज तयार करता येणाऱ्या या डिटॉक्स ड्रिंकमुळे तुमच्या शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होईल.

यामुळे आरोग्याच्या Health अनेक समस्या दूर होतील. अपचन, कोलेस्ट्रलसारख्या समस्या दूर होण्यासोबतच त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.

काकडीचं डिटॉक्स ड्रींक

हे डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी एका मिक्सरमध्ये एका काकडीचे तुकडे आणि १० ते १५ पानं टाका. यामध्ये अर्धा कप पाणी टाका आणि मिक्सरमध्ये काकाडी बारीक करा. यानंतर सर्व मिश्रण गाळून घ्या. यामध्ये एक चमचा लिंबाचा रस, काळं मीठ आणि चिमूटभर काळीमिरी पूड टाका. आठवड्यातून दोनदा हे ड्रिंक प्यायल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.

सफरचंद दालचिनी ड्रिंक

ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील साखरेचं प्रमाण निंत्रणात रहावं यासाठी सफरचंद आणि दालचिनीचं डिटॉक्स ड्रिंक फायदेशीर ठरू शकतं. हे ड्रिंक तयार करण्यासाठी एका काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात एका सफरचंदाचे बारीक तुकडे करून टाका.

यात १ मोठा दालचिनीचा तुकडा आणि १ ग्लास पाणी टाकून २-३ तासांसाठी झाकून ठेवा. ३ तासांनंतर या डिटॉक्स ड्रिंकचं सेवन करु शकता. या डिटॉक्स ड्रिंकमुळे चयापचय क्रिया जलद होत असल्याने वजन कमी होण्यास मदत होवू शकते.

हे देखिल वापरा-

detox drinks health benefits
Digital Detox: सोशल मीडियामुळे ढासळतंय मानसिक संतुलन? या टिप्स वापरा

धण्यांचं डिटॉक्स ड्रिंक

धण्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. धण्याचं डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी २ ग्लास पाण्यामध्ये २ चमचे धणे रात्रभर भिजत ठेवा किंवा सकाळी २ ग्लास पाण्यास २ चमचे धणे ५ मिनिटांसाठी उकळून घ्या. त्यानंतर पाणी गाळून दिवसभरात या पाण्याचं सेवन करा.

सकाळी रिकाम्यापोटी या डिटॉक्स ड्रिंकचं सेवन केल्यास शरीराला अधिक फायदा मिळतो. यामुळे त्वचा, केस, किडनीचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. तसंच रक्तशुद्ध होतं.

लिंबू, पुदीना डिटॉक्स ड्रिंक

शरीर डिटॉक्स करण्यासाठी हे एक झटपट होणारं डिटॉक्स ड्रिंक आहे. यासाठी १ ग्लास पाण्यामध्ये १ लिंबाचा रस टाका. त्यानंतर काही पुदीन्याची पानं टाका. त्यानंतर १ तासासाठी ग्लास झाकून ठेवा. त्यानंतर हे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही पिऊ शकता. आठवड्यातून ४-५ वेळा तुम्ही या ड्रिंकचं सेवन करू शकता.

खरं तर डिटॉक्स ड्रिंक तयार करणं ही मोठी रेसिपी नसून ते अगदी झटपट तयार होत असल्याने तुम्ही नक्कीच आठवड्यातून किमान ते ३-४ वेळा ट्राय करू शकता. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.