Weightloss Without Diet : डायटिंग न करता वजन कमी करायचे आहे ? मग,‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

डायटिंग न करता देखील तुम्ही वजन कमी करू शकता.
Weightloss Without Diet
Weightloss Without Dietesakal
Updated on

Weightloss Without Diet : वजन कमी करणे हे आजकाल अनेकांसाठी चॅलेंज झाले आहे. वजन वाढण्याची समस्या आजकाल लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना भेडसावत आहे. किशोरवयीन मुला-मूलींमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

फास्टफूड, बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक कारणे वजन वाढण्यामागे असू शकतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करतात. हे डाएट प्लॅन फॉलो करून ही त्यांचे वजन कमी होत नाही, अशी देखील कित्येकांची तक्रार असते.

डाएट प्लॅन फॉलो करून अनेक जण स्वत:ची भूक देखील मारतात. जे की पूर्णपणे चुकीचे आहे. डायटिंग न करता देखील तुम्ही वजन कमी करू शकता. होयं हे खरं आहे. आहाराचे योग्य नियोजन करून याला व्यायामाची जोड दिली तर तुम्ही वजन कमी करू शकता.

चला तर मग आज आपण अशा सोप्या टिप्सबद्दल जाणून घेऊयात, ज्या फॉलो करून तुम्ही वजन कमी करू शकता. शिवाय, यासाठी तुम्हाला डायटिंग करण्याची गरज पडणार नाही.

जास्तीत जास्त पाणी प्या

पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. जास्तीत जास्त पाणी पिऊन वजन कमी केले जाऊ शकते. त्यामुळे, वेटलॉस रूटीनमध्ये पाण्याला विशेष महत्व आहे. पाणी शरिराला हायड्रेटेड ठेवते आणि वजन कमी करण्यासाठी मदत देखील करते. यासाठी दिवसभरात तुम्ही ७-८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.

Weightloss Without Diet
Health Problems : सणासुदीच्या काळात आरोग्य बिघडले आहे का ? मग आहारात ‘हे’ बदल करायला विसरू नका

चांगली झोप घ्या

वजन कमी करण्यासाठी चांगली झोप घेणे देखील गरजेचे आहे. जेणेकरून शरिरातील मांसपेशी चांगल्या प्रकारे रिकव्हर होऊ शकतील. जर तुम्ही रोज रात्री ७-८ तास झोप घेतली तर यामुळे तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही फास्ट होण्यास मदत होईल. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी याचा फायदा होईल.

शिवाय, यामुळे तुमच्या शरिराचे मेटॅबॉलिजम देखील चांगले राहिल. चांगली झोप घेतल्यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स राहिल.

प्रक्रियायुक्त पदार्थांपासून दूर रहा

अनेक डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ प्रकियायुक्त पदार्थ अर्थात ‘रेडी टू इट’ पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. खास करून वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांनी प्रकिया केलेले अन्न(प्रक्रियायुक्त) टाळावे.

त्याऐवजी, घरी बनवलेले ताजे अन्न खावे. सामान्य अन्नाच्या तुलनेत पॅकबंद असलेल्या खाद्यपदार्थामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. घरच्या घरी कमी कार्ब्स आणि हायप्रोटिन असलेला आहार घ्या.

सकाळचा नाश्ता चुकवू नका

सकाळचा नाश्ता हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे, सकाळचा नाश्ता अजिबात चुकवू नका. वजन कमी करण्यासाठी नाश्ता करणे हा अतिशय प्रभावी मार्ग ठरू शकते.

सकाळचा नाश्ता पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असावा, यामुळे पोट भरलेले राहते आणि शरिराला ऊर्जा मिळते. पोट भरलेले असल्यामुळे इतर काही खाण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Weightloss Without Diet
Breakfast Benefits: सकाळचा नाश्ता आहे सर्वात महत्वाचा, अनेक आजारांचा धोका होईल कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()