Hip Fat Loosing Exercise: आपल्या शरीरातील विविध भागांची चरबी काही कारणाने वाढत असते. वजन वाढले की अनेकांना ऑकवर्ड वाटतं तर ते कसे कमी करता येईल याची चिंताही सतत भेडसावत असते. बट फॅट कमी करण्याचे अनेक उपाय लोक शोधत असतात. तेव्ही बट फॅट कमी करण्यासाठी आज आपण सोप्या एक्झरसाइज कोणत्या ते जाणून घेऊया. (Fat Burning Exercises)
हे काही व्यायाय तुम्ही नियमित केल्यास लगेच फरक जाणवेल
१. वॉरियर पोज- ३
हा व्यायाम शरीराच्या खालच्या भागाला टोनिंग करण्यास मदत करेल.
हा व्यायाम करण्यासाठी पायांमध्ये ४ फूट अंतर ठेवून सरळ उभे राहा. श्वास सोडताना उजव्या पायाची बोटे ९० अंशाच्या अंतराने उजवीकडे वाकवा. उजवा गुडघा समांतर होईपर्यंत वाकवा. नंतर श्वास सोडताना डोके वाकवून छाती मांड्यांपर्यंत पोहोचताच विश्रांती घ्या. हात सरळ ठेवून नंतर दोन्ही हात जोडून शरीराचे संपूर्ण वजन उजव्या पायाकडे वळवा. आता हळूहळू डावा पाय मागे हवेत वर करा. त्यानंतर संतुलन साधल्यानंतर हात पुढे आणि पाय मागे पसरवा. त्यानंतर, श्वास सोडताना, डावा पाय जमिनीच्या दिशेने आणा. आता हाच व्यायाम दुसऱ्या पायानेही करा.
२. कॅमल पोज
हा व्यायाम रोज केल्याने नितंबांवर जमा झालेल्या चरबीसोबतच पोटाची चरबीही कमी होते. हा व्यायाम करण्यासाठी गुडघ्यावर बसा. नंतर कंबरेपासून मागे वाका. आता आपल्या हातांनी पायांच्या घोट्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. मान आणि डोके मागे टेकवा. कंबरेच्या भागाला हलकेच दाबा. सामान्यपणे श्वास घ्या आणि काही सेकंद या स्थितीत राहा. मग पायांच्या घोट्यांवरून हात काढा आणि आराम करा. ही प्रक्रिया पुन्हा करा.
३. टायगर पोज
हा व्यायाम केल्याने पोट, कंबर, नितंब आणि मांड्यांची चरबी कमी होते. तसेच याने पाठीचा कणा तसेच पाठीचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. हे करण्यासारखे टेबल पोजमध्ये आपले हात आणि गुडघे टेकवा. उजवा गुडघा कपाळाकडे आणताना व गोलाकार करताना श्वास घ्या. श्वास सोडताना उजवा पा वरच्या दिशेने न्या. मणक्याचे कमान करत वरच्या दिशेने बघा. नंतर एकदा श्वास घ्या आणि पाय 4-8 वेळा वर उचला. श्वास सोडण्यासाठी टेबल पोझमध्ये गुडघा परत जमिनीवर खाली करा.
४. चेयर पोज
चेअर पोज हा एक असा व्यायाम आहे जो संपूर्ण शरीराला टोन करतो. यात खुर्चीवर बसल्याप्रमाणे स्नायू स्थिर आणि मजबूत ठेवा. नितंब-रुंदीपेक्षा किंचित रुंद पाय आणि आपल्या बाजूला हात ठेवून सरळ उभे रहा. श्वास घ्या आणि कानाजवळ हात वर करा, मनगट आणि बोटांनी सरळ आणि समांतर वाढवा. खांदे खाली आणि पाठीचा कणा तटस्थ ठेवा. श्वास सोडताना गुडघे वाकवून मांड्या आणि गुडघे समांतर ठेवा. नितंबांवरून किंचित खाली या आणि खुर्चीवर बसल्यासारखे बसा. 30 सेकंद ते 1 मिनिट या पोजमध्ये राहा. नंतर सामान्य स्थितीत परत या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.