Healthy Lunch: निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे आणि योगा करणे गरजेचे असते. जेव्हा तुम्ही योग्य आहार घेऊ शकत नाही, तेव्हा पोटाशी संबंधित अनेक आजार होऊ लागतात. पोटाशी संबंधित अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.
तुम्ही तुमच्या आहारात जे पदार्थ घेतात ते सर्वप्रथम तुमच्या पोटाच्या आरोग्यावर परिणाम करतात. म्हणून पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला विशेष पदार्थांचा समावेश करावा लागेल. दुपारच्या जेवणात दही खाऊ शकता. यामुळे तुमच्या पोटासबंधित अनेक आजार दूर राहतात. तसेच दह्याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित कोणते आजार दूर होतात ते जाणून घेऊया.
आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांमध्ये डायरियाची समस्या वाढू लागली आहे. त्यावर उपाय म्हणून योग्य आहार घेणे गरजेचे आहे. सकाळच्या जेवणात जास्त प्रथिने घेतली जातात आणि म्हणून तुम्ही दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश केला पाहिजे. दह्याचे सेवन केल्याने डायरियाची कमी होऊ शकते.
पोट फुगणे ही सामान्य समस्या असली तरी यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर तुमची पोटफुगीची समस्या दूर होऊ लागते. पोट फुगणे खूप त्रासदायक असू शकते आणि त्यासाठी तुम्ही दररोज दुपारी जेवणात एक वाटी दही खावे. यामुळे समस्या दूर होईल.
अनेक लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते. त्यामागे खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली हे कारण आहे. दुपारच्या जेवणात दही खाल्यास बद्धकोष्ठतेसह पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. दह्यामध्ये असलेले फायबर आणि प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठचा त्रास कमी करतात.
अपचन ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या येत असतील तर त्यामुळे अनेक मोठ्या आजारांचा धोका वाढू शकतो. ज्याचा सामना करण्यासाठी तुम्ही आहारात दह्याचा समावेश करू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.